बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यामधील एक आश्वासन सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाची लस मोफत देण्यात येईल, असं आश्वासन भाजपाने दिलं आहे. त्यांच्या या आश्वासनावर बॉलिवूड दिग्दर्शक ओनिर यांनी जोरदार टीका केली. भाजपा करोना लसीचं देखील राजकारण करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

अवश्य पाहा – ‘बेजबाबदार सिद्धार्थमुळे एलिमिनेट झाले’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्री संतापली

“आता मतदानाच्या बदल्यात लस दिली जाणार आहे. हे अत्यंत दुदैवी आहे. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही भाजपाला मतदान करत नाही तोपर्यंत तुम्हाला करोना लसीसाठी वाट पाहावी लागणार? राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चालला आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन ओनिर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं हे ट्विट बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा

बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.

काय काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात

१) करोनाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार

२) मेडिकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार

३) ३ लाख शिक्षकांची भरती करणार

४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार

५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार

६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार

७) दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची उभारणी

८) धान्य आणि गहूसोबत सरकार डाळीही विकत घेणार

९) २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार

१०) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात राज्य पहिल्या क्रमांकावर आणणार

११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार