02 March 2021

News Flash

मातृप्रेम! पिल्लांसाठी स्वत:च्या जीव धोक्यात टाकणाऱ्या उंदरीणीचा व्हिडीओ दिग्दर्शकाने केला पोस्ट

आई आई असते... उंदाराच्या मादीचा व्हिडिओ दिग्दर्शकाने केला शेअर

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक ओनिर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते बिनधास्त प्रतिक्रिया देतात. मात्र यावेळी ओनिर चक्क एका उंदरीणीमुळे चर्चेत आहेत. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका उंदरीणीचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील वेड्या आईची वेडी माया सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सध्या देशभरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाचं पाणी उंदरांच्या बिळांमध्ये शिरकाव करु लागलंय. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी उंदीर बिळातून बाहेर पडू लागले आहेत. असाच एक व्हिडीओ ओनिर यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका उंदरीणीच्या बिळात पावसाचं पाणी भरताना दिसतंय. दरम्यान आपली पिल्लं पाण्यात बुडून मरु नयेत म्हणून ही उंदरीण स्वत:चे प्राण धोक्यात घालून आपल्या पिल्लांना वाचवताना दिसत आहे. “रात्री झोपण्यापूर्वी हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहिला. सर्वात बेस्ट व्हिडीओ आहे हा” अशा आशयाची कॉमेंट त्यांनी या व्हिडीओवर केली आहे.

ओनिर यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पिल्लांचे प्राण वाचवणाऱ्या त्या उंदरीणीचं कौतुक केलं आहे. तसेच इतका भन्नाट व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी ओनिर यांचे आभारही मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 1:11 pm

Web Title: onir shares video rat rescue her child mppg 94
Next Stories
1 …म्हणून ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याने नाकारली ‘बिग बॉस १४’ची ऑफस
2 ‘ब्रीद २’मधल्या कलाकारांची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून व्हाल थक्क!
3 कल्कीने बॉयफ्रेंडसोबतचा असा फोटो केला शेअर, चाहत्यांनी दिल्या मजेशीर कमेंट
Just Now!
X