26 November 2020

News Flash

टेलिव्हिजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा रंगणार ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये

२१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता

आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे ‘लग्न सोहळा’! ही संकल्पना मुळातच भव्य, आनंददायी… वधू – वर बघण्यापासून ते थेट वधूची पाठवणी होईपर्यंतचा हा थाटामाटात पार पडणारा सोहळा सगळ्यांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग. त्यात लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय. पण, सद्यस्थिती लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊन बसले आहे.

आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे. पण, आता मात्र ऑनलाईन लग्नाच्या गाठी जुळणार आहेत. शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये अखेर शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. एकीकडे वर्‍हाड, नवरा मुलगा एका बेटावर, नवरी मुलगी दुसर्‍याच बेटावर आणि लग्न घडवून आणणारे भटजी तिसर्‍याच स्वतंत्र बेटावर… शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी झाल्या, बोलणं सुरू झालं आणि या दोघांचे हे नातं ऑनलाईनच जुळलं.

आणखी वाचा : अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यात जुंपली

काही विघ्न आली पण शर्वरीच्या साथीने हे दोघे त्यातून बाहेर पडले आणि आता टेलिव्हिजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा रंगणार आहे. लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:43 pm

Web Title: online wedding first time on television watch shubh mangal online serial ssv 92
Next Stories
1 ‘जयपूर पिंक पँथर’वर येतेय वेब सीरिज; अभिषेकने शेअर केलेला ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
2 अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यात जुंपली
3 हेलन- सलीम खान यांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’
Just Now!
X