News Flash

केवळ ३३ टक्के युनिटच्या उपस्थितीत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात- आदिनाथ कोठारे

मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना सरकारने आखलेल्या नियमांचे पालन केले जात आहे.

लॉकडाउननंतर आता हळूहळू मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका, ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेचे चित्रीकरण देखील पुन्हा सुरु झाले आहे. चित्रीकरण करत असताना मालिकेच्या सेटवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आता ही मालिका लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण मालिकेचे चित्रीकरण सुरु करण्यासाठी केवळ ३३ टक्के यूनिटच सेटवर उपस्थित असल्याचे समोर आले आहे.

या मालिकेची निर्मिती आदिनाथ कोठारेने केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याविषयी त्याने वक्तव्य केले आहे. “तुमच्या लाडक्या ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेचे चित्रीकरण आता सुरु झाले आहे. ही मालिका, रात्री ८.३० वाजता ‘झी युवा’ वाहिनीवर पुन्हा एकदा सुरु होते आहे. कोविड-१९साठी आखून दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत” असे त्याने म्हटले आहे.

“केवळ ३३ टक्के युनिटच्या उपस्थितीत मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. सेटवर उपस्थित असलेली मंडळी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत आहेत. तसेच क्रू मेंबर्सला पीपीई किट्स देण्यात आले आहेत. सेटवर प्रवेश करण्याआधी सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक असून आरोग्यसेवा देण्यासाठी सेटवर एक टीम चोवीस तास उपस्थित असते. चित्रीकरण करत असताना कुठलाही नियम मोडणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात येतेय. राज्यशासन, सांस्कृतिक मंत्रालय यांच्यामुळे आज चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. आदेश बांदेकर, नितीन वैद्य, सुबोध भावे आणि अमोल कोल्हे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मराठी मनोरंजन विश्वात चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली आहे. तुमची ही लाडकी मालिका, ‘झी युवा’ वाहिनीवर पाहायला विसरू नका” असे त्याने पुढे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 5:37 pm

Web Title: only 33 percent of unit work for serial shoot prem poison panga avb 95
Next Stories
1 टॉम क्रुज देणार निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर?; व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?
2 राम गोपाल वर्मा यांनी शेअर केला ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड फोटो, झाले ट्रोल
3 वैशाली सामंत यांचं ‘सुवासिनी’ गाणं ऐकलंत का ?
Just Now!
X