३१ चित्रपट प्रदर्शित केले जाणार

गेल्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद बघता ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, सप्तक  आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान उपराजधानीत ऑरेंज सिटी आंतरराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध देशांतील राष्ट्रीय आणि आंतरराट्रीय पुरस्कार विजेते ३१ चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जात असताना उपराजधानीतील रसिकांना जगभरातील चित्रपट बघायला मिळावे आणि नवीन पिढीने या क्षेत्राचा अभ्यास करावा या उद्देशाने गेल्यावर्षी चित्रपट महोत्सव आयोजित केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जास्तीत जास्त युवकांनी या महोत्सवाकडे वळावे यावेळी दाखविण्यात बहुतेक चित्रपट युवकांच्या विषयांशी संबधित असणार आहे. स्पर्धेत आलेली चित्रपटाशिवाय जागतिक पातळीवर गाजलेली काही चित्रपट या महोत्सवात दाखविली जाणार आहे. याशिवाय मराठी आणि आंतरराष्ट्रीय पातळवीर पुरस्कार प्राप्त चित्रपट यावेळी रसिकांना बघायला मिळेल आणि त्या चित्रपटाची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपटावर आधारित दोन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीला या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पर्सिस्टंट सभागृहात होईल आणि सिनेमॅक्ससह चार ठिकाणी चित्रपट दाखविण्याची सोय केली जाणार आहे. विदर्भात चित्रपटाच्या निर्मितीच्या क्षेत्रात अनेक नवीन लोक येत आहे. चांगल्या कथा लिहिणारे विदर्भात तयार झाले आहे, असेही जब्बार पटेल म्हणाले. यावेळी समीर नखाते, विलास मानेकर, उपस्थित होते.

ऑरेंज सिटी आंतरराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त उद्या, रविवारी सकाळी १० वाजता पर्सिस्टंट सभागृहात म्युझिक इंडियन सिनेमा या विषयावर कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत सुश्रृत वैद्य यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि समर नखाते चित्रपटातील बदलत्या काळातील संगीत या विषयावर माहिती देणार आहे.