आकडेवारीत बाजी ‘मॅडमॅक्स : फ्युरी रोड’ची, लिओनाडरे डीकॅपरिओ सर्वोत्तम अभिनेता

तद्दन व्यावसायिक ‘मॅडमॅक्स फ्युरी रोड’ या चित्रपटाने तांत्रिक गटांमधील सहा ऑस्कर पटकावत अनपेक्षितरीत्या ८८व्या ऑस्कर पारितोषिकांच्या आकडेवारीमध्ये बाजी मारली . मात्र प्रत्यक्ष मानाच्या पुरस्कारांची विभागणी ही ‘द रेव्हनण्ट’ आणि ‘स्पॉटलाइट’ या चित्रपटांमध्ये झाली. ‘स्पॉटलाइट’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटासोबत पटकथेचाही पुरस्कार मिळाला. तर दोन दशकांहून अधिक काळ नामांकनावर बोळवण होत असलेल्या लिओनाडरे डीकॅपरिओ या अभिनेत्याचे ‘द रेव्हनण्ट’च्या निमित्ताने यंदा पुरस्कार वर्ष उजाडले. याच चित्रपटासाठी आलेहान्द्रो इन्यारितू याला दिग्दर्शनाचे ऑस्कर मिळाले.

दिग्दर्शक जॉर्ज मिलर यांच्या ‘मॅडमॅक्स : फ्युरी रोड’ या चित्रपटाला १० गटांमध्ये ऑस्कर नामांकने होती. पैकी संकलन, निर्मिती, ध्वनिसंकलन, ध्वनी मिश्रण, वेशभूषा आणि केशभूषा व  रंगभूषा  या विभागांतील पारितोषिके या चित्रपटाने मिळविली.

ख्रिस्ती धर्मगुरूंकडून लहान मुलाच्या लैंगिक शोषणाचे चर्चकडून दाबण्यात आलेल्या प्रकरणाला उघडकीस आणणाऱ्या पत्रकारितेची गाथा दाखविणाऱ्या ‘स्पॉटलाइट’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटासह पटकथेचा पुरस्कार मिळाला.

गेली दोन दशके महत्त्वपूर्ण चित्रपटांमधील भूमिकांसाठी ऑस्करच्या स्पर्धेत अंतिम क्षणी बाद झालेल्या लिओनाडरे डीकॅपरिओ या अभिनेत्याचे यंदा पाचवे नामांकन होते.  तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतानाही यंदा त्याच्या पुरस्काराचे सर्वाधिक कुतूहल गेले काही महिने रंगले होते.

‘द रेव्हनण्ट’च्या निमित्ताने त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचे पहिले ऑस्कर मिळाले. याच चित्रपटासाठी दिग्दर्शक आलेहान्द्रो इन्यारितू यांना आणि सिनेमॅटोग्राफीसाठी इमॅन्यूएल लुबेज्की यांना पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार ब्री लार्सन हिला ‘द रूम’ चित्रपटासाठी मिळाला. तर सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मार्क रायलन (ब्रिज ऑफ स्पाइस), सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार अलिशिया विकांदेर (डेनिश गर्ल) हिला मिळाला. परभाषिक चित्रपटात हंगेरीच्या ‘सन ऑफ सोल’ चित्रपटाने बाजी मारली.

स्पॉटलाइटमध्ये काय?

बालकांच्या लैंगिक शोषणाचे चर्चने दाबून टाकलेले प्रकरण उकरून काढणाऱ्या ‘बोस्टन ग्लोब’च्या पत्रकारितेची कथा मांडणारा टॉम मॅकार्थी दिग्दर्शित ‘स्पॉटलाइट’ हा चित्रपटही नैतिक-अनैतिक संघर्षांचे प्रातिनिधिक रूप दाखविणारा आहे. बोस्टन ग्लोबच्या पुलित्झर पारितोषिकप्राप्त ठरलेल्या लेखांची मालिका चित्रपटासाठी वापरण्यात आलेली आहे.

पत्रकारांच्या मूलभूत प्रवृत्तींचे अत्यंत तपशिलातील बारकावे चित्रपटात नमूद झालेले आहेत. पुराव्यांसाठी जंगजंग पछाडण्याची अस्सल पत्रकारी प्रवृत्ती यातल्या कलाकारांनीही उत्तमरीत्या साकारली आहे.

बालकांच्या लैंगिक शोषणाचे चर्चने दाबून टाकलेले प्रकरण उकरून काढणाऱ्या ‘बोस्टन ग्लोब’च्या पत्रकारितेची कथा मांडणारा टॉम मॅकार्थी दिग्दर्शित ‘स्पॉटलाइट’ हा चित्रपटही नैतिक-अनैतिक संघर्षांचे प्रातिनिधिक रूप दाखविणारा आहे. बोस्टन ग्लोबच्या पुलित्झर पारितोषिकप्राप्त ठरलेल्या लेखांची मालिका चित्रपटासाठी वापरण्यात आलेली आहे.

पत्रकारांच्या मूलभूत प्रवृत्तींचे अत्यंत तपशिलातील बारकावे चित्रपटात नमूद झालेले आहेत. पुराव्यांसाठी जंगजंग पछाडण्याची अस्सल पत्रकारी प्रवृत्ती यातल्या कलाकारांनीही उत्तमरीत्या साकारली आहे.

भारतीय वंशाचे ब्रिटिश चित्रपट निर्माते आसिफ कपाडिया यांनी ‘अ‍ॅमी’ या माहितीपटासाठी ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गायिका अ‍ॅमी वाइनहाऊस हिचा जीवनप्रवास व दुर्दैवी मृत्यूवर आधारित हा माहितीपट आहे. वाइनहाऊस यांचा सत्ताविसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला होता. कपाडिया यांना याआधी गोल्डन ग्लोब व बॅफ्टा पुरस्कारही मिळाला आहे.  कपाडिया यांनी २०१२ मध्ये इरफान खानची भूमिका असलेला ‘द वॉरियर’ चित्रपट २००३ मध्ये दिग्दर्शित केला होता.‘अ‍ॅमी खरी कोण होती हे आपण जगाला दाखवले, टॅब्लॉइड वृत्तपत्रांनी ज्या सनसनाटी बातम्या दिल्या, तशी ती नव्हती. ,’ असे आसिफ कपाडिया यानी पुरस्कारानंतर स्पष्ट केले.

पाकिस्तानची दुसऱ्यांदा बाजी

पाकिस्तानी पत्रकार व चित्रपट निर्मात्या शरमीन औबैद चिनॉय यांच्या ‘अ गर्ल इन द रिव्हर- द प्राइस ऑफ फॉरगिव्हनेस’ या लघुपटास ८८व्या ऑस्कर सोहळ्यात गौरवण्यात आले. ऑनर किलिंगमधून बचावलेल्या मुलीची ही कहाणी आहे. शरमीन यांना या गटात दुसऱ्यांदा ऑस्कर मिळाले आहे. २०११ मध्ये त्यांना याच गटात ऑस्कर मिळाले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर ऑनर किलिंगबाबतचा कायदा बदलण्याचा निर्णय घेतला .

२३ वर्षे हुलकावणी देणारा पुरस्कार..

‘व्हॉटस इटिंग गिल्बर्ट ग्रेप’साठी १९९४ मध्ये अवघ्या एकोणीसाव्या वर्षी लिओनाडरे डिकॅपरिओला सहायक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. ‘एव्हिएटर’साठी दुसरे नामांकन २००५ साली लाभले होते.

‘ब्लड डायमंड’साठी २००७ साली, ‘वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’साठी २०१४ साली नामांकन मिळाले होते. मात्र प्रत्येक वेळी पुरस्कार दुसऱ्यालाच लाभत होता. यंदाच्या ‘द रेव्हनण्ट’ या चित्रपटात लिओनाडरे ह्य़ूज ग्लास या लढवय्या व्यक्तीची भूमिका केली आहे.

‘द रेव्हनण्ट’ चित्रपट हा माणसाचे निसर्गाशी नाते सांगणारा आहे. हवामान बदल हे  वास्तव आहे. त्यावर आताच उपाय करायला हवेत नाही तर मानव व इतर प्राणी-वनस्पतींना धोका आहे,  हवामान बदल रोखण्यासाठी कृती करण्यात चालढकल होते आहे, पण भान ठेवून काम केले पाहिजे, असे त्याने पुरस्कार  स्वीकारल्यानंतर केलेल्या मनोगतामघ्ये स्पष्ट केले.