करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत हजारो लोकांनी या विषाणूमुळे प्राण गमावले आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहे. अशा या प्राणघातक विषाणूवर ऑस्कर विजेते लेखक चार्ल्स रॅन्डॉल्फ एक चित्रपट तयार करत आहेत.

अवश्य पाहा – चित्रपटांची होम डिलिव्हरी; हे ‘सात’ चित्रपट प्रदर्शित होणार हॉटस्टारवर

‘डेडलाईन’ने दिलेल्या वृत्तानुसार एस. के. ग्लोबल या कंपनीने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे. चीमनधील वुहान येथून करोना विषाणूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली. ज्यावेळी पहिल्यांदा या विषाणूबाबत वैद्यकिय तज्ज्ञांना माहिती मिळाली त्या परिस्थितीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु आहे. चार्ल्स रॅन्डॉल्फ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

अवश्य पाहा – ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’मधून जॅक स्पॅरोला केलं बाहेर; ही अभिनेत्री साकारणार मुख्य व्यक्तिरेखा

महाराष्ट्रात ५ हजार २५७ नव्या करोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार २५७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १८१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद मागील २४ तासांमध्ये झाली आहे. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील आहे तर उर्वरित १०३ मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के इतका आहे. मागील २४ तासात २३८५ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. आत्तापर्यंत ८८ हजार ९९० करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ५२.३७ टक्के झाला आहे. तर आजच्या घडीला राज्यात ७३ हजार २९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही १ लाख ६९ हजार ८८३ इतकी झाली आहे.