News Flash

Oscar 2021: ऑस्कर विजेत्याने मानले पालकांचे आभार, कारण वाचाल तर हैराण व्हाल

सोशल मीडियावर डॅनियेलचं भाषण चर्चेत

(Photo: AP Photo/Chris Pizzello, Pool)

नुकताच ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमासह तीन पुरस्कार पटकावले आहे. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पार पडला.

डॅनियेल कालूया या अभिनेत्याला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रात्प झाल्यानंतर डॅनियेलला प्रचंड आनंद झाला. पुरस्कार स्विकारताना डॅनियेलने आनंदाच्या भरात आई-वडिलांबद्दल असं काही सांगितलं की यामुळे आता तो चांगलाच चर्चेत आला आहे.

ऑस्कर स्विकारताना अभिनेता डॅनियेलने आभार मानताना पहिल्यांदा देवाचे आभार मानले. मात्र त्यानंतर तो असं काही म्हणाला की सर्वचं चकीत झाले. डॅलियेल म्हणाला, ” आयुष्य सुंदर आहे. माझ्या आई-वडिलांनी शरीर संबध ठेवले म्हणूनच आज मी इथे आहे.  ” असं डॅनियेल म्हणाला आणि सर्वचं थक्क झाले.

महत्वाचं म्हणजे याच वेळी डॅनियेलची आई आणि बहिण त्याचं हे भाषण लंडनमधील युके हबमध्ये ऐकत होत्या. डॅनियेलच्या या विधानानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाली आहे. डॅनियेलचं हे वाक्य ऐकून त्याच्या आईला धक्काच बसला. तर बहिणीला हसू आवरणं कठीण झालं.

वाचा: ऑस्कर 2021 पुरस्कारांची संपूर्ण यादी

डॅनियेलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. अनेकांनी त्याच्या या बिनधास्त भाषणाचं कौतुक केलंय. आई वडिलांमुळे मी या जगात आहे आणि त्यामुळे या पुरस्काराचा मी मानकरी आहे. हे सांगण्याच्या डॅनियेलच्या या हटके अंदाजला सोशल मीडियावर अनेकांनी पसंती दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 2:16 pm

Web Title: oscar winner daniel kaluuya oscars acceptance speech goes viral as he thanks parents having sex kpw 89
टॅग : Entertainment News
Next Stories
1 “…या कारणांमुळे एका आठवड्यातच मी केली कोरोनावर मात !”
2 ‘कलंक आहेस तू’, त्या ट्वीटमुळे अनुपम खेर झाले ट्रोल
3 ‘राधे’मधील नवे गाणे प्रदर्शित, सलमानचा अनोखा अंदाज चर्चेत