News Flash

‘ऑस्कर’मध्ये श्रीदेवी व शशी कपूर यांना श्रद्धांजली

मेमोरियम सेगमेंटमध्ये दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली अर्पण केली जाते

जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेमोरियम सेगमेंटमध्ये या दोन भारतीय कलाकारांना स्थान देण्यात आले.

लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ९० वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. ऑस्करमध्ये ‘मेमोरियम सेगमेंट’ असतो. यात वर्षभरात निधन झालेल्या सिनेसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. जगभरात सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्यांना मानवंदना देण्याचा हा एक प्रयत्न असतो. यंदा मेमोरियम सेगमेंटमध्ये एडी वेडर यांनी रुम अॅट द टॉप हे गाणे सादर केले. या गाण्याद्वारे दिग्गजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात स्क्रीनवर श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे नाव येताच तमाम भारतीय प्रेक्षकांचे डोळे पाणावले.

श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी रोजी दुबईत निधन झाले. बाथटबमधील पाण्यात बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. श्रीदेवी यांची ही एक्झिट चित्रपटप्रेमींसाठी धक्काच होती. गेली पाच दशके श्रीदेवी यांनी तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच प्रमुख सिनेसृष्टींमध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यांनी जवळपास ३०० सिनेमांमध्ये काम केले होते. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाले होते. हिंदीसह इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 10:22 am

Web Title: oscars 2018 academy remembers sridevi and shashi kapoor memoriam segment eddie vedder room at the top
Next Stories
1 Oscars 2018: ‘सॅम रॉकवेल’ सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता; कारकिर्दीतला पहिला ऑस्कर
2 Oscars 2018 : ऑस्कर सोहळ्यात ‘आली रे आली, हार्वी तुझी बारी आली’
3 Oscars 2018 : ९० व्या ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटरचा’ दबदबा, तर हार्वीसारख्या नराधमांचा ‘टाईम्स अप’
Just Now!
X