गेल्या वर्षभरात करोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या टाळेबंदीने चित्रपट व्यवसायाचे कं बरडे मोडले आहे. चित्रपटगृहे बंद असताना या कलाकारांना मोठा आधार मिळाला तो नव्याने येऊन आता प्रस्थापित होऊ पाहात असलेल्या ओटीटी माध्यमाचा.. योगायोग असा की, चित्रपटगृह बंद झाल्याने या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता तो महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा या जोडीचा ‘गुलाबो सिताबो’ आणि त्यानंतर जे चित्रपट किं वा वेबमालिका ओटीटीवर प्रदर्शित झाल्या त्यात दखल घेण्याजोगा चेहरा ठरला तो अभिषेक बच्चनचा. गेल्या वर्षभरात ओटीटी माध्यमांमुळे मी इतकं  भरभरून काम के लं आहे, तेवढं गेल्या दहा वर्षांतही के लेलं नाही, असं तो म्हणतो. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला ‘द बिग बुल’ हा चित्रपट हॉटस्टारवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. याआधी त्याची भूमिका असलेला ‘ल्यूडो’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

करोनाकाळात सगळं काही ठप्प झालं असताना लोकांना ओटीटीमुळे मनोरंजनाचं नवं दालन खुलं झालं. लोकांचा या ओटीटी माध्यमांना मिळणारा प्रतिसाद जसा वाढत गेला तसं कलाकारांसाठीही नव्या भूमिकांचा खजिना खुला झाला, असं अभिषेक म्हणतो. टाळेबंदीत चित्रपटसृष्टीतील अनेक जण घरी बसलेले असताना मी मात्र वेबमालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होतो. या काळात लोकांची कोमे बंद झाली होती आणि मी एक कलाकार म्हणून पूर्णवेळ कार्यरत होतो यासाठी या माध्यमाचे आभार मानले पाहिजेत. अनेक कलाकारांना ओटीटी माध्यमामुळे कामाच्या नवनव्या संधी मिळाल्या आहेत. एरव्ही या कलाकारांना चित्रपट व्यवसायात स्थिरावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असता, मात्र ओटीटी माध्यमांमुळे त्यांना हरतऱ्हेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ओटीटी माध्यम हेच भविष्य आहे, असे तो आग्रहाने सांगतो. मात्र ओटीटी माध्यमांचा विस्तार म्हणजे चित्रपटयुगाचा अंत हे म्हणणे चुकीचे असल्याचेही तो स्पष्ट करतो. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा उपग्रह वाहिन्या सुरू झाल्या तेव्हाही अशीच ओरड झाली होती. आता घरबसल्या मनोरंजन होतं आहे, चित्रपट पहायला मिळत आहेत, त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याचे प्रमाण कमी होणार अशीच अटकळ तेव्हा बांधली गेली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. आजघडीला दूरचित्रवाहिन्यांचाही व्याप तेवढाच वाढला आहे आणि चित्रपट व्यवसायाचा पसाराही तितकाच मोठा आहे, याकडे तो लक्ष वेधतो. आत्ताही दूरचित्रवाहिन्या, ओटीटी वाहिन्या आणि चित्रपट ही तिन्ही माध्यमे समांतररीत्या कार्यरत राहतील, असे तो म्हणतो.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

‘द बिग बुल’ हा सत्तर एमएमचा पडदा लक्षात घेऊन के लेला भव्य चित्रपट आहे, असे तो म्हणतो. मात्र करोनाचा वाढता संसर्ग, चित्रपटगृहांवरची बंदी, प्रेक्षकांच्या मनात असलेली भीती या सगळ्याचा विचार करत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्याने सांगितले. या चित्रपटात त्याने बिग बुल म्हणून ओळखल्या गेलेल्या हर्षद मेहता यांच्यापासून प्रेरित असलेली हेमंत शहा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मुंबईतील चाळीत मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या तरुणाच्या डोळ्यातील स्वप्नं, चाळीतून बाहेर पडून मोठं होण्याची त्याची आकांक्षा, त्याला ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची मिळालेली संधी आणि त्यासाठी त्याने के लेली धडपड या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटल्या, असे तो म्हणतो. एखादी व्यक्ती चांगली की वाईट यापेक्षाही कोणत्या परिस्थितीचा सामना करत ते व्यक्तिमत्त्व घडलं या दृष्टिकोनातून दिग्दर्शक कु की गुलाटी यांनी ही कथा रंगवल्याचं अभिषेकने सांगितलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अशा वेगवेगळ्या भूमिका याआधीही के ल्या आहेत. नायक नेहमीच चांगला असतो असं नाही. त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे त्यात बरेवाईटपणा दोन्ही असतो आणि अशा व्यक्तिरेखा प्रेक्षकांना जास्त जवळच्या वाटत असल्याचे निरीक्षणही त्याने नोंदवले.

‘द बिग बुल’ या चित्रपटाची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ऐंशी आणि नव्वदच्या दशकाचे चित्रण असं तो म्हणतो. त्या काळातील मुंबई आणि त्या वेळच्या लोकांची वेशभूषा, त्या वेळी प्रसिद्ध असलेल्या आलिशान गाडय़ांमधून फिरणं हे सगळं अनुभवताना खूप मजा आली. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे माझं त्या वेळचं आवडतं शीतपेय गोल्डस्पॉटही निर्मात्यांनी कु ठून माहिती नाही, पण चित्रीकरणासाठी उपलब्ध के लं होतं. या जुन्या गोष्टी नव्याने अनुभवणं ही वेगळी मौज होती, असे त्याने सांगितले.

एका अर्थी अभिषेक बच्चनच्या कारकीर्दीतील हा टप्पा त्याच्यासाठी त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा अधिक वेगळा ठरतो आहे असं म्हणायला हरकत नाही. गेल्या दहा वर्षांत अगदीच निवडक भूमिकांमधून अभिषेकला लोकांनी पाहिले आहे. गेल्या वर्षी ‘ब्रेथ २’ या वेबमालिकेने त्याच्या कारकीर्दीची ही कोंडी फोडली. या वेबमालिके तील त्याच्या भूमिके चे कौतुक झाले. त्यानंतर ‘सन्स ऑफ सॉईल’, ‘ल्यूडो’ आणि आता ‘द बिग बुल’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर आला. ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ हे त्याचे आणखी दोन आगामी चित्रपटही वेगळे असल्याने त्याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.

करोनाकाळात सगळं काही ठप्प झालं असताना लोकांना ओटीटीमुळे मनोरंजनाचं नवं दालन खुलं झालं. लोकांचा या ओटीटी माध्यमांना मिळणारा प्रतिसाद जसा वाढत गेला तसं कलाकारांसाठीही नव्या भूमिकांचा खजिना खुला झाला. अनेक कलाकारांना ओटीटी माध्यमामुळे कामाच्या नवनव्या संधी मिळाल्या आहेत. एरव्ही या कलाकारांना चित्रपट व्यवसायात स्थिरावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असता, मात्र ओटीटी माध्यमांमुळे त्यांना हरतऱ्हेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ओटीटी माध्यम हेच भविष्य आहे.

अभिषेक बच्चन