30 October 2020

News Flash

पाकिस्तानी अभिनेता साकारणार सुशांतची भूमिका?

त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिल्याच्या चर्चा सुरु होत्या

गेल्या काही दिवसांपासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता हसन खान प्रमूख भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा हसन खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमुळे सुरु झाल्या होत्या. तसेच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता याबाबत सत्य समोर आले आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अभिनेता हसन खान किंवा इतर कोणत्याही कलाकाराला कमीशन लायसेन्स दिलेले नाही’ असे म्हटले आहे.

काय होती हसन खानची पोस्ट?

एक प्रोजेक्ट मिळाला आहे. जो माझ्या हृदयाजवळ आहे. भारतीय वेब सीरिजमध्ये सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारण्याची संधी मिळाली असे हसनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 4:44 pm

Web Title: ott platform denies working on any sushant singh rajput project with pakistani actor avb 95
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये रिकामटेकड्या लोकांमुळे वाढतंय ट्रोलिंग- सोनाक्षी सिन्हा
2 पाच वर्षांनंतर अभिनेत्री सोडणार ‘भाबीजी घर पर है’ मालिका, निर्माते म्हणाले…
3 साराच्या ‘कुली नं.१’ चित्रपटावर मीम्सचा पाऊस
Just Now!
X