सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. पण यावर्षी या उत्साहावर करोनाचा प्रादुर्भावही ठळकपणे जाणवतोय. उत्सव साजरा करण्यासाठी शासनाने काही नियम आखले आहेत. अशातच झी युवा वाहिनीवरील मालिकांमधून एक सामाजिक संदेश दिला जात आहे.

शासनातर्फे या वर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय आणि साध्या पद्धतीने, करोना संदर्भातल्या सर्व खबरदारी पाळत साजरा करण्याचा आदेश जाहीर केला गेलाय. यात आता झी युवा वाहिनीही सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या कार्यक्रमांमधून या संदर्भातले संदेश देण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

झी युवा वाहिनीचे कलाकार त्यांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सोशल डिस्टंन्सिगचे महत्व सांगताना दिसतायेत. डॉक्टर डॉन, प्रेम पॉयजन पंगा, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण अशा लोकप्रिय मालिकांमधले हे कलाकार प्रेक्षकांना गणेशोत्सवामध्ये गर्दी टाळण्याच्या, बाहेर न पडण्याच्या आणि घरातच राहण्याच्या सूचना करताना दिसतात. मी गर्दीत जाणार नाही कोरोनाला घरी आणणार नाही हा सामाजिक संदेश झी युवा आणि या कलाकारांतर्फे दिला जातोय.