इंटरनेटवर सध्या प्रचंड प्रमाणात विनोदी शो व सिनेमे उपलब्ध आहेत. तरीही प्रत्येक क्षणाला हसवणारा व करमुणुकीच्या दृष्टीनेही उत्कृष्ट असणारा शो सापडणं कठीण आहे. हंगामा प्लेची पहिली मराठी विनोदी वेब-सीरिज ही अशी सीरिज आहे की ती इतकं हसवेल की हास्याची मोजदाद करणं कठीण होईल. पहिल्या भागाच्या पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत हा शो अशी गोष्ट सांगतो जी याआधी कधी बघितली नव्हती. कलाकार पण अत्यंत गुणी असून त्यांची कामं उत्कृष्ट झाली आहेत आणि हा शो बघताना संपूर्ण वेळ आनंदच मिळेल याची हमी आहे!

Marathi actor Chinmay Mandlekar why not using social media
“एक्स खूप मोठी गटार गंगा…”, चिन्मय मांडलेकरचं स्पष्ट मत; सोशल मीडियावर सक्रिय नसण्याबाबत म्हणाला…
Video: Woman Wants To Live Together With Husband, Lover.
VIDEO: नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही…३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

कथा

हंगामा प्लेनं हिंदीमध्ये तीन ओरिजिनल शो सादर केले आहेत – डॅमेजड, हंकार व बार कोड आणि यातल्या प्रत्येक शोनं काही ना काही नवीन दिलं आहे. आता हंगामाच्या पहिल्या मराठी ओरिजिनल शोसाठी देखील हंगामा प्लेनं अशी कथा सादर केली आहे जी या आधी तुम्ही कधी बघितली नसेल.

पॅडेड की पुशअपची कथा आदित्य (अनिकेत विश्वासराव) भोवती फिरते जो, मध्यमवर्गीय आहे, नोकरी टिकवण्यासाठी धडपडतोय व श्रीमंत मुलीच्या स्वराच्या (तेजश्री प्रधान) प्रेमात आहे. स्वराच्या आईच्या म्हणजे मंगलाच्या (किशोरी अंबिये) इच्छेविरोधात दोघं पळून जातात. सासू जावयाच्या आयुष्यात ढवळाढवळ करते ज्यामुळे शो खूपच रंजक व हास्यप्रधान होतो.

आपण सुयोग्य पती असल्याचं सिद्ध करण्यासाठी आदित्य महिलांची अंतर्वस्त्रं विकणारा सेल्समन म्हणून नोकरी स्वीकारतो. परंतु त्याला स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांची काहीही माहिती नसते आणि त्यामुळे कामाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी त्याला कल्पक अशा क्लृप्त्या योजाव्या लागतात. त्याला नेहमी साथ देणारा त्याचा खास मित्र असतो सनी (सक्षम कुलकर्णी), जो त्याला स्त्री-शरीराची कल्पना करून देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो वर्णन करण्यासाठी फळांचा वापर करतो. आदित्यला अंतर्वस्त्रांचे आकार समजावेत म्हणून सनी प्रत्यक्षात त्या फळांचा वापर करतो. पण इथंच हे संपत नाही! सासूपासून तसेच बायकोपासून आपल्या कामाचं स्वरूप आदित्यला लपवावं लागतं. यामुळं त्याचं आयुष्य आणखीनच विनोदी बनतं कारण त्याच्या सासूला त्याच्या कामाच्या स्वरूपाविषयी संशय यायला लागतो.

अन्य गोष्टींबरोबरच, कार्यक्रमाची लांबी ही या शोची जमेची बाजू आहे. यामध्ये फक्त पाच भाग आहेत त्यामुळे शोचं सातत्य हरवत नाही आणि तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तसेच या शोची कल्पना अत्यंत अभिनव आहे ज्याची कल्पना तुम्हाला हा ट्रेलर बघून येईल:

कास्टिंग कू

पॅडेड की पुशपमध्ये कॅफेमराठी व हंगामानं कास्टिंग कूच नियोजन केलं आहे! अनिकेत विश्वासराव, तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये व सक्षम कुलकर्णी हे प्रख्यात कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत आणि या सगळ्यांनी या सीरिजबरोबरच डिजिटल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्रत्येक कलाकार त्याच्या रोलमध्ये अत्यंत चपखल बसतो आणि याचं श्रेय निर्मात्यांना द्यायलाच हवं. त्यांनी एका शोमध्ये इतके चांगले कलाकार घेतल्यामुळे त्यांचं कौतुक करायलाच हवं!

कामगिरी

कलाकारांच्या विनोदी संवादफेकीचं टायमिंग गेल्या काही काळात प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमांच्या तोडीस तोड आहे. वेगवेगळ्या ग्राहकांना महिलांची अंतर्वस्त्र विकताना असलेले अनिकेतचे सीन्स, आई व पतीमध्ये शांतता राखण्यासाठी तेजश्री तारेवरची कसरत करत असतानाचे सीन्स, जावयावर गुप्त नजर ठेवतानाचे किशोरी अंबियेचे सीन्स तर ब्राचे विविध उपयोग सांगतानाचे सक्षम कुलकर्णीचे सीन बघताना प्रेक्षक हास्यकल्लोळात इतके लोळतात की त्यांना स्वत:वर नियंत्रण राखणं जड जातं.

दिग्दर्शन

आकाश गलसुरे या दिग्दर्शकानं ही काळजी घेतलीय की हा शो बीभत्स होणार नाही आणि संपूर्ण शोचा आस्वाद घेता येईल. जसे तुम्ही शोच्या शेवटाकडे पोचता तुमच्या लक्षात येतं की विनोद व खट्याळपणापलीकडे दिग्दर्शकानं एक चांगला संदेशही गुंफलेला आहे: काम हे काम असतं आणि तुम्ही कुठलंही काम करत असाल तरी त्याची तुम्हाला लाज वाटता कामा नये!

तर तुम्ही अस्सल विनोदी व करमणूक करणाऱ्या शोच्या शोधात असाल तर इथं क्लिक करा आणि बघा पॅडेड की पुशअप हंगामा प्लेवर.