News Flash

“तुम्ही मास्क वापरणारच नव्हता ना?”; करोना पॉझिटिव्ह ट्रम्प यांची अभिनेत्रीने उडवली खिल्ली

डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान अभिनेत्री पद्मा लक्ष्मी हिने ट्रम्प यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. “त्या दिवशी तुम्ही मास्क वापरणाऱ्यांची खिल्ली उडवली होती, अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं?”, असा उपरोधिक टोला तिने डोनाल्ड ट्रम्प यांना लगावला आहे.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे वारे वाहात आहेत. निवडणूकीला उभे राहिलेले उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी जो बिडन यांच्या मास्कची खिल्ली उडवली होती. या पार्श्वभूमीवर पद्मा लक्ष्मी हिने ट्रम्पवर निशाणा साधला आहे. “मी जो बिडन सारखं मास्क वापरत नाही. जेव्हा त्यांना पाहतो तेव्हा ते मास्कमध्येच दिसतात. असं म्हणत तुम्ही त्यांची खिल्ली उडवली होती. अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं…” अशा आशयाचं ट्विट करुन पद्माने उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला करोनाची लागण झाली असून आपण क्वारंटाइन होत असल्याची माहिती दिली होती. “अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक…फर्स्ट लेडी आणी मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 1:29 pm

Web Title: padma lakshmi us president donald trump tests covid positive mppg 94
Next Stories
1 कमबॅकसाठी जेनेलिया तयार; ‘ही’ भूमिका करण्याची इच्छा
2 VIDEO: महात्मा गांधींचं आवडतं भजन गाऊन लता मंगेशकर यांनी केलं अभिवादन
3 युपी पोलिसांनी राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्जवर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…
Just Now!
X