News Flash

दीपिकाच्या न होऊ शकलेल्या सासु- सासऱ्यांनी तिला दिले खास गिफ्ट

सगळ्यात खास गिफ्ट दीपिकाला मिळालं

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर पद्मावत सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. करणी सेनेच्या तीव्र विरोधानंतरही हा सिनेमा अनेक ठिकाणी हाऊसफुल होत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर दीपिका, रणवीर आणि शाहिदच्या कामाचे भरभरून कौतुक केले.तिघांच्याही घरी शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सगळ्यात खास गिफ्ट दीपिकाला मिळालं आहे. दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर बॉलिवूड स्टार रणबीर कपूरच्या आई- वडिलांनी अर्थात नितू आणि ऋषी कपूर यांनी तिच्या उत्कृष्ट कामाबद्दल शुभेच्छा म्हणून फुलांचा गुच्छ पाठवला. यासोबत त्यांनी तिचे कौतुक करणारी एक चिठ्ठीही पाठवली. ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो. नितू आणि ऋषी कपूरकडून तुला खूप सारे प्रेम.’ दीपिकाही त्यांना धन्यवाद बोलायला विसरली नाही. दीपिकाने तो फुलांचा गुच्छ आणि चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘तुम्हा दोघांना प्रिमिअरला पाहून फार बरं वाटलं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद.’

दरम्यान, करणी सेनेकडून होत असलेल्या तीव्र विरोधानंतरही सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सिनेमा भरघोस कमाई करत आहे तर दुसरीकडे करणी सेनेचा विरोध अूनही कायम दिसत आहे. ‘पद्मावत’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आईवर सिनेमा काढणार असल्याचे करणी सेनेचे जयपूरचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह यांनी म्हटले आहे. सध्या या सिनेमाच्या पटकथेचं लेखन सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले. ‘याचवर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून ‘लीला की लीला’ असे नाव या सिनेमाला दिले जाणार असल्याची घोषणा सेनेने केली आहे. अरविंद व्यास या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:04 pm

Web Title: padmaavat deepika padukone starrer film succes ranbir kapoor parents neetu kapoor and rishi kapoor send so much love to padmaavat actress
Next Stories
1 ‘जाट समाजानंतर राजपूत देश जाळत आहेत, पण फक्त मुस्लिमांना देशद्रोही म्हटलं जातं’
2 रोझ मॅक्गोवनचा एकतर्फी लढा
3 सेलेना गोमेझच्या हेकेखोरपणाला वुडी अ‍ॅलनच्या शुभेच्छा
Just Now!
X