News Flash

रणबीरची शेवटची आठवणही दीपिकाने मिटवली?

...कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला

दीपिका पदुकोण

सेलिब्रिटींची प्रेमप्रकरणं म्हणजे कधीही न संपणारा चर्चेचा विषय. अशा या बहुचर्चित प्रेमप्रकरणांमध्ये काही वर्षांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत होते. कलाविश्वातही त्यांच्याच प्रेमाचे वारे वाहत होते. या प्रेमाचं प्रतीक म्हणून दीपिकाने तिच्या मानेवर मागच्या बाजूला ‘आर.के.’ अशी अक्षरं असणारा एक टॅट्टूही गोंदवून घेतला होता. पण, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. रणबीरच्या आठवणींपासून दीपिका बरीच दूर गेली, इतकच काय तर तिने मानेवरचा टॅट्टूही मिटवल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावरुन हैदराबादला जात असताना दीपिकाच्या मानेवर टॅट्टू काढलेल्या भागावरच काही पट्ट्या लावलेल्या दिसल्या. त्यामुळे तिने टॅट्टूची सर्जरी केल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षीसुद्धा दीपिकाने हा टॅट्टू मिटवल्याच्या चर्चा होत्या. पण, आता मात्र तिच्या मानेवरील ती पट्टी पाहता खरंच बी- टाऊनच्या या मस्तानीने तिच्या आयुष्यातील काही गोष्टी पूर्णपणे विसरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?

वाचा : रोलंट ओल्टमन्स यांच्यासाठी पाकिस्तान हॉकीची धावाधाव, संघाला पुन्हा प्रशिक्षण देण्याची गळ 

रणबीरसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतरही त्यांच्या नात्यात मैत्री मात्र कायम आहे. सध्या दीपिका अभिनेता रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये असून येत्या काळात हे दोघं लग्न करण्याचा निर्णय घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. तेव्हा आता दीपिकाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यावरच चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 1:53 pm

Web Title: padmaavat movie fame bollywood actress deepika padukone removed ranbir kapoor tattoo
Next Stories
1 ….म्हणून ‘पॅडमॅन’मधील माझ्या भूमिकेवर कात्री लावली- सोनम कपूर
2 ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका- शोएब अडकले लग्नबंधनात
3 अरे ही तर ‘सेम टु सेम’ प्रियांका चोप्राच!
Just Now!
X