दर महिन्यातले ‘ते’ पाच दिवस कुठल्याही स्त्रीसाठी, मग ती शहरातली असो किंवा गावातली, तितकेच वेदनामय असतात. शहरातले सुशिक्षित म्हणावेत तर या पाच दिवसांमध्ये स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स शहरात कुठल्याही दुकानांमध्ये सहज मिळतात आणि ते वापरले जातात, इतकाच काय तो फरक. कारण आजही या पाच दिवसांशी जोडल्या गेलेल्या विटाळाच्या कल्पना, कपड्यांवर डाग पडून लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून चालणारी धडपड, स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी पुरुषांकडून व्यक्त होणारी असंवेदनशीलता, हेटाळणी अशा अनेक गोष्टी गावागावांत आणि शहरांतही त्याच पद्धतीने ठाण मांडून आहेत. या पाश्र्वभूमीवर आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट एक माध्यम म्हणून या सगळ्या प्रथा, समज-गैरसमजांवर पुन्हा विचार करायला लावणारा आहे. अक्षय कुमार, राधिका आपटे यांनी ‘पॅडमॅन’मधून एक मोठे आव्हान स्वीकारले आहे.

वाचा : ‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे

अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पॅडमॅन’ चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने १०.२६ कोटींचा गल्ला जमविला आहे. ‘पॅडमॅन’ पहिल्या दिवशी १३ – १४ कोटींची कमाई करेल. तर प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट जवळपास ५० कोटींची कमाई करू शकतो’, असे व्यापार समीक्षक गिरीश जोहर ‘इंडियन एक्स्प्रेस’ वेबसाइटशी बोलताना म्हणाले.

वाचा : ‘हो.. मी कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते’

दरम्यान, ‘पद्मावत’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी झालेले वादविवाद, जीवे मारण्याच्या धमक्या, जाळपोळ, सेटवर तोडफोड या सर्व घटनांना सामोरं जाऊनही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.