अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जरी पुढे ढकलण्यात आली तरी त्याविषयीच्या चर्चा काही कमी झालेल्या नाहीत. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’मुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले. ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘पॅडमॅन’ची टीम जोमाने प्रमोशन करत असून एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘पॅडमॅन’ चित्रपटात ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती करणारे अरुणाचलम मुरुगानंदम यांची कथा दाखवण्यात आली आहे. आता नव्याने प्रदर्शित झालेल्या १ मिनीट ३९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एका मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर गावातल्या महिलांकडून कशाप्रकारे आनंद साजरा करण्यात येतो, हे दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाचीही झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओतून ‘लडकी सनायी हो गयी’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
वाचा : …म्हणून ‘पद्मावत’च्या सेटवर शाहिद पडला एकटा
क्रिअर्ज एंटरर्टेन्मेंट आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना या चित्रपटाच्या माध्यमातून एक अनोखा विषय प्रेक्षकांसमोर आणत आहेत. ज्या विषयावर बोलण्यास अनेकजण कचरतात किंवा त्याबद्दल सहसा बोलणे टाळले जाते. अक्षयसोबतच राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 4:02 pm