News Flash

VIDEO : खिलाडी कुमार म्हणतोय, ‘पाहायला विसरु नका…. देवा’

खिलाडी कुमार काय म्हणतोय ऐकले का?

अक्षय कुमार

कलाविश्वात एखाद्या चांगल्या कलाकृतीच्या प्रसिद्धीसाठी अनेकदा सेलिब्रिटी आपली चौकट ओलांडत असल्याचे कित्येकदा पाहायला मिळाले आहे. याचे आणखी एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळतेय. खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार सध्या एका मराठी चित्रपटाची प्रसिद्धी करत असल्याचे पाहायला मिळेतय. अंकुश चौधरीची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘देवा- एक अतरंगी’ या चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये तो, चक्क मराठीमध्ये बोलताना दिसत असून, रसिकांना ‘देवा’ हा चित्रपट पाहायला जाण्याचे आवाहन करताना दिसतोय. ‘देव तारी त्याला कोण मारी…’ ही म्हण म्हणत अक्षय या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना दिसतोय. तर अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडिओच्या शेवटी मोठ्या अभिमानाने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, असे म्हणणारा अक्षय प्रेक्षकांची मनं जिंकतोय.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या चित्रपटाचे इतक्या भन्नाट पद्धतीने केलेले प्रमोशन पाहून सध्या ‘देवा’ची टीमही आनंदात असणार यात वाद नाही. हाच आनंद व्यक्त करत अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खिलाडी कुमारचे आभार मानले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश कधीही न पाहिलेल्या अशा वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २२ डिसेंबरला ‘देवा- एक अतरंगी’तून पुन्हा एकदा अंकुश प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:04 pm

Web Title: padman fame bollywood actor akshay kumar promotes marathi film deva ankush choudhary
Next Stories
1 पुनरागमन करु इच्छिणाऱ्या कपिलच्या मार्गातील ‘हा’ अडथळा माहितीये?
2 दीपिकाआधी हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘पद्मावती’
3 ‘एस दुर्गा’नंतर आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात
Just Now!
X