News Flash

‘पद्मावती’चा वाद एकीकडे आणि रणवीर- दीपिकाचे प्रेम एकीकडे

दोघंही प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या मनःस्थितीत नव्हते

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

‘पद्मावती’ सिनेमावरचे संकट कमी होण्याची चिन्हं काही दिसत नाहीत. मात्र याचा दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमावर फारसा फरक पडलेला नाही. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवता यावा म्हणून डिनर डेटला गेले होते. मुंबईतील नावाजलेल्या रेस्तराँमध्ये त्या दोघांना एकत्र येताना पाहण्यात आले. यावरूनच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा किती फोल आहेत ते दिसून आले. दोघंही प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे ते कोणाशीही न बोलता सरळ रेस्तराँमध्ये निघून गेले.

या दोघांनी आतापर्यंत त्यांचे नाते सर्वांसमोर मान्य केले नसले तरी त्यांनी त्यांचे नाते नाकारलेही नाही. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका व्हिडिओमार्फत त्याच्या आयुष्यातले दीपिकाचे स्थान किती महत्त्वाचे आहे ते सांगितले होते. रणवीरने व्हिडिओमध्ये ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ असे म्हणत खुद्द दीपिकालाही काही क्षणांसाठी थक्क केले होते.

‘ज्याप्रमाणे कोट्यवधी चाहत्यांच्या आयुष्यात येऊन तू त्यांचे आयुष्य प्रकाशमान केले आहेस त्याचप्रमाणे तू माझं आयुष्यही प्रकाशमान केले आहेस. देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यातही असा आनंद कायम राहो, कारण तुझ्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही’, असे म्हणत रणवीरने दीपिकाप्रती आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले अन् बॉलिवूडला आणखी एक ‘सिझलिंग कपल’ मिळाले. यानंतर दोघांनी ‘बाजीराव- मस्तानी’ आणि आगामी ‘पद्मावती’ सिनेमांत एकत्र काम केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 9:50 am

Web Title: padmavati deepika padukone ranveer singh dinner
Next Stories
1 PHOTOS : आमिर-किरणने थीम पार्कमध्ये साजरा केला आझादचा वाढदिवस
2 बिपाशा-करणच्या ‘त्या’ जाहिरातीला सलमानचा विरोध
3 TOP 10 NEWS : मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी आणि गॉसिप
Just Now!
X