News Flash

पाहा- ‘पद्मावती’च्या रुपातील दीपिकाची पहिली झलक

२०१७ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दीपिका पदुकोण

काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटातील त्याच्या लूकची एक झलक प्रेक्षकांना दाखवली होती. रणवीर या चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीरमागोमाग आता या चित्रपटामधील दीपिकाच्या फर्स्ट लूकवरुनही पडदा उठला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मेवाडच्या राणीची म्हणजेच पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टरने या चित्रपटातील दीपिकाच्या लूकचे एक रेखाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे.

पारंपारिक वेशभूषेमध्ये असलेल्या या रेखाचित्रामध्ये दीपिकाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात दीपिकाची या चित्रपटातील भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाच्या भूमिकांची पहिली झलक पाहायला मिळाल्यानंतर आता अनेकांचे लक्ष शाहिद कपूरच्या फर्स्ट लूककडे लागले आहे.

‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता चांगलेच तयारीला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता संजय लीला भन्साळी या चित्रपटाबाबत जास्तच काळजी घेत आहेत. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती, मेवाडचे राणा रतन सिंग यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात येणार आहेत. ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये १३ ते १४ व्या शतकातील चित्रण साकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळची मेवाडची समृद्ध संस्कृती पाहता त्यावर जास्त लक्ष केंद्रित येत आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहिद कपीर यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर फार मेहेनत घेतल्याचे कळत आहे. २०१७ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया छाया सौजन्य- सोशल मीडिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 3:55 pm

Web Title: padmavati deepika padukones first look revealed through social media
Next Stories
1 सोनम आणि राधिका बनल्या आयकॉन ऑफ इंडिया
2 ‘वजह तुम हो’च्या अभिनेत्रीचे चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत डेटींग?
3 आलियाला झाली होती वर्ग साफ करण्याची शिक्षा
Just Now!
X