02 March 2021

News Flash

Padmavati first look: राणी पद्मावती पधार रही हैं..

‘पद्मावती’ चित्रपटाचे दोन शाही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

दीपिका पदुकोण, पद्मावती

‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही भन्साळींचं संगीत आणि दिग्दर्शन असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षावर ‘पद्मावती’ कितपत उतरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तत्पूर्वी, या चित्रपटाचे दोन शाही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. पोस्टरमधील दीपिकाचा लूक पाहून आम्ही त्यांना शाही पोस्टर असे का म्हटलेय ते तुम्हाला नक्कीच कळेल.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दीपिका राणी पद्मिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार असून, शाहिद या चित्रपटामध्ये राजा रावल रतन सिंगची भूमिका साकारणार आहे.

वाचा : सिनेमा प्रदर्शनापूर्वीच साराने दाखवले ‘स्टार कीड’चे नखरे?

‘पद्मावती’ चित्रपटाचा लोगो काल ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. शाही अंदाजात ‘रानी पद्मावती पधार रही हैं… कल सूर्योदय के साथ.’ असे म्हणत पहाटेच पोस्टर लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आज दीपिकाचा रॉयल लूक असलेले दोन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर भरजरी दागिने दीपिकाच्या सौंदर्यात अधिक भर पाडत आहेत. एका पोस्टरमध्ये दीपिका हात जोडून उभी असलेली दिसते तर दुसऱ्या पोस्टरमध्ये तिचा संपूर्ण शाही लूक पाहावयास मिळतो. हे पोस्टर पाहता चित्रपट किती भव्य असेल याचा पुरेपूर अंदाज येतो.

वाचा : करिनावर प्रेम करणाऱ्या तुषारला करावा लागला होता भावाचा रोल

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं कथानक हाताळत भन्साळींनी हा चित्रपट साकारण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली असून, व्हायकॉम १८ पिक्चर्स आणि भन्साळी प्रॉडक्शन्स चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दीपिका, रणवीर, शाहिदच्या ऐतिहासिक भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 8:22 am

Web Title: padmavati first look deepika padukone looks royal
Next Stories
1 एमएमएस ते मुलाचं नाव, ‘या’ कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती करिना
2 सिनेमा प्रदर्शनापूर्वीच साराने दाखवले ‘स्टार कीड’चे नखरे?
3 करिनावर प्रेम करणाऱ्या तुषारला करावा लागला होता भावाचा रोल
Just Now!
X