13 August 2020

News Flash

‘पद्मावती’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता

या ट्रेलरनंतर लोकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.

पद्मावती, दीपिका पदुकोण

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

वाचा : कोपर्डी बलात्कारप्रकरणी शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यापासून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीपर्यंत..

दिगदर्शक भन्साळी ‘पद्मावती’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जातेय. या ट्रेलरमध्ये दीपिका आणि शाहिद यांच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, यात या दोघांमध्ये काही जबरदस्त आणि रोमॅण्टिक संवाद दाखवले जाणार असल्याचेही म्हटले जातेय. या ट्रेलरनंतर लोकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. मात्र, अद्याप ट्रेलरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

वाचा : जानेवारी महिन्यापासून राजकारणात सुरु होणार ‘रजनी’पर्व?

येत्या १ डिसेंबरला म्हणजेच उद्या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही राजकीय नेते आणि राजपूत संघटनांनी केलेल्या विरोधामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही काळाकरिता ‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले. आतापर्यंत सहा राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनमधील सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, भारतीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्यानंतरच परदेशात चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय ‘पद्मावती’च्या निर्मात्यांनी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2017 9:07 am

Web Title: padmavati sanjay leela bhansali to release second trailer featuring deepika padukone and shahid kapoor
Next Stories
1 TOP 10 NEWS : कोपर्डी बलात्कारप्रकरणी शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यापासून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीपर्यंत..
2 शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता लग्न करणार?
3 जानेवारी महिन्यापासून राजकारणात सुरु होणार ‘रजनी’पर्व?
Just Now!
X