27 February 2021

News Flash

जॉनच्या ‘पागलपंती’मध्ये झळकणार तगडी स्टारकास्ट

हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

गेल्या अनेक दिवसापासून अनीस बझ्मी यांच्या ‘पागलपंती’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम आणि इलियाना डिक्रुझ ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अद्याप तरी या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.मात्र या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन या चित्रपटातील स्टारकास्टची नावं जाहीर केली आहेत. आदर्श यांच्या ट्विटनुसार, या चित्रपटात जॉन आणि इलियानाव्यतिरिक्त अनिल कपूर, अर्शद वारसी, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, पुलकित सम्राट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि अभिषेक पाठक करत आहेत.

येत्या १७ फेब्रुवारीपासून पागलपंतीच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन आणि इलियाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. तर जॉनसोबत पहिल्यांदाच एकत्र झळकणाऱ्या इलियानाने या आधीही ‘मुबारकाँ’ चित्रपटात बझ्मींसोबत काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 9:47 am

Web Title: pagalpanti movie starcast
Next Stories
1 देव आनंद यांच्या नातवाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
2 हुबेहूब दिसणाऱ्या तिला पाहून अनुष्का म्हणते..
3 ..म्हणून हिना खान ‘कसौटी जिंदगी की २’ मालिका अचानक सोडणार
Just Now!
X