News Flash

मानसी अनिकेतने केलं लग्न, काय असेल समरची पुढची चाल?

'पाहिले न मी तुला' मालिका एका वेगळ्या वळणावर

‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शशांक केतकर, तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच हा मालिकेत प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे. या मालिकेची कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते.

मनुचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा सपाटा लावतात. समर मनूच्या आई वडिलांवर स्वतःची छाप टाकण्यासाठी तिचे लग्न लावून देण्याची जबाबदारी घेतो. मनुला हा धक्का सहन होत नाही, जर समरने कोणी मुलगा समोर उभा केला तर आई वडील लगेच तयार होतील, अशी तिला खात्री होते.

मनू अनिकेतला सांगते की आता आपल्यासमोर काही पर्याय उरला नाहीये, दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा विचार ही मी करू शकत नाही, अखेर नाईलाजाने मनू अनिकेत घरच्यांना अंधारात ठेवून लग्न करतात. त्यांच्या या प्रेमाच्या नात्याला नवी ओळख मिळाल्याने दोघेही प्रचंड आनंदी आहेत. पण घरच्यांपासून हे सत्य लपवण त्यांना पटत नाही. दोघे मिळणं धीर एकवटून घरी त्यांचं लग्न झालं हे सांगायचं ठरवतात.

परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच आहे. देसाईंच्या घरावर अनाहूतपणे संकट कोसळत. त्यामुळे राजन देसाईंची तब्येत बिघडते, घरचं वातावरण डळमळीत होतं. या प्रकाराने मनुचा धीर खचतो. अनिकेत सांगतो, जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपण लग्नाविषयी कोणाला काही सांगायचं नाही. पण समरच्या मनात काहीतरी वेगळंच आहे, तो देसाई घरावर आणि मनुवर आलेल्या या कठीण परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागतो. त्यामुळे आता समरची पुढची चाल काय असणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 6:25 pm

Web Title: pahile na me tula serial update avb 95
Next Stories
1 ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी दिली होती ऑडिशन आणि झाली ‘मिर्झापूर’ची ‘गोलू’
2 बापरे! भर स्टेजवर अभिनेत्रीने उतरवले कपडे
3 अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला तीन वर्षांचा तुरुंगवास
Just Now!
X