25 January 2021

News Flash

“एक वोट की कीमत तुम क्या जानो बिहारी बाबू”; अभिनेत्रीचा मतदारांना लाखमोलाचा सल्ला

बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक

बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झालं आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या सात नोव्हेंबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण ७८ जागांसाठी मतदान होणार असून १०६६ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. दरम्यान अभिनेत्री पाखी हेगडे हिने “योग्य आणि प्रामाणिक उमेदवारालाच मतदान करा” अशी विनंती बिहारच्या नागरिकांना केली आहे. शिवाय “एक वोट की किमत तुम क्या जानो बिहारी बाबू” असं म्हणत तिने मतदानाचं महत्व देखील समजावून सांगितलं आहे.

अवश्य पाहा – ‘किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं’; अर्णब गोस्वामींच्या अटकेवर दिग्दर्शक समाधानी

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पाखीने बिहार विधानसभा निवडणूकीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “एक वोट की किमत तुम क्या जानो बिहारी बाबू. आपण एक मत पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याच्या विकासाची दिशा ठरवतं. त्यामुळे भावनांच्या आहारी न जाता योग्य उमेदवारालाच मतदान करा. ज्या दिवशी बिहारमधील नागरिकांना कामासाठी इतर राज्यांत जावं लागणार नाही. उलट काम मिळवण्यासाठी इतर राज्यांतील लोक बिहारमध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. त्यामुळे वोटिंग मशिनचं बटण दाबण्यासाठी बोटासोबतच मेंदूचा देखील वापर करा” असा सल्ला पाखीने बिहारी जनतेला दिला आहे.

अवश्य पाहा – ‘आमच्या भावनांशी खेळ नकोस’; दया बेनच्या त्या फोटोंवर चाहते संतापले

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 11:50 am

Web Title: pakhi hegde on bihar election 2020 mppg 94
Next Stories
1 फोटोतील ‘या’ चिमुकल्याला ओळखलं का? ‘मिर्झापूर’मध्ये साकारलीये जबरदस्त भूमिका
2 नव्या भूमिकेसाठी टायगर सज्ज; शेअर केलं आगमी चित्रपटाचं पोस्टर
3 Video : अशी झाली ‘दख्खनचा राजा जोतिबा’च्या स्टारकास्टची निवड
Just Now!
X