बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनयातही आपलं नाणं खणखणीत वाजवणा-या रणवीरच्या मागे आज लाखो मुली वेड्या आहेत. त्याच्या स्टाइल स्टेटमेन्टला अनेक जण फॉलो करतात. मात्र, आजकाल रणवीरच्या ऐवजी कोणी दुसराच व्यक्ती सोशल मिडीयावर चर्चेत आहे. तो म्हणजे रणवीर सिंगचा जुळा भाऊ. विचारात पडलात ना.. आता रणवीरचा जुळा भाऊ कुठून आला. अहो, रणवीरला काही खरोखरचा जुळा भाऊ सापडलेला नाही. तर त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा व्यक्ती सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/BMhF69jh3go/

https://www.instagram.com/p/BMJwKRHBaF8/

पाकिस्तानमधील हमद शोएब हा हुबेहुब रणवीर सिंगसारखाच दिसतो. हमद शोएब हा एक व्यावसायिक असून तो गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीया आणि वृत्तपत्रांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एका पाकिस्तानच्या ब्लॉगरने हमदला रणवीर म्हणून संबोधल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली. तेव्हापासून हमद शोएब सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/BPZkcunhq3a/

हमदच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास हे नक्की हमदचे फोटो आहेत की रणवीरचे असा प्रश्न पडतो. त्याचसोबत हमदने सोशल मिडीयावर त्याच्या डान्सचेदेखील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात त्याचे डान्स मूव्हसही रणवीरसारखेच असल्याचे दिसेल. मात्र, हमदच्या मते तो अजिबात रणवीरसारखा दिसत नाही. पण, जर लोकांना मी रणवीरसारखा दिसत असेन तर ते मी माझे भाग्य समजतो, असेही हमद म्हणाला. आता हमदचे फोटो पाहिल्यावर रणवीर काय प्रतिक्रिया देतो याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असेल.