पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्ररान खान अफेअर आणि लग्नांमुळे कायम चर्चेत असतात. इम्रान खान यांनी त्यांच्या लूकने ७० ते ८० च्या दशकात एका बॉलिवूड अभिनेत्रीवर जादू केल्याचे म्हटले जात होते. ही अभिनेत्री त्यावेळी बॉलिवूडमध्ये तिच्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजामुळे लोकप्रिय होती.
इम्रान खान पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कर्णधार असताना एकदा भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करत त्यांच्या लूकने अनेक तरुणींच्या मनावर राज्य केले होते. दरम्यान त्याच वेळी एका पार्टीमध्ये इम्रान यांची ओळख बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी झाली असल्याचे म्हटले जाते. झीनत या ७० ते ८०च्या दशकातील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून लोकप्रिय होत्या. झीनत यांचे सौंदर्य पाहून इम्रान त्यांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते. त्या एका पार्टीनंतर इम्रान आणि झीनत यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र इम्रान आणि झीनत यांचे नाते फार काळ चालले नाही. त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. अफेअरच्या चर्चानंतर अखेर काही दिवसांतच झीनत यांनी मजहर खान यांच्याशी विवाह केला तर इम्रान खान यांनी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी लग्न केले.
झीनत यांचा जन्म १९५१ साली झाला. त्यांनी १९७१ साली ‘हलचल’ चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. पण ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात झीनत यांनी देवानंद यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर झीनत या बोल्ड सीन्ससाठी विशेष ओळखू लागल्या.
First Published on November 20, 2019 1:36 pm