News Flash

पाकचा नापाक इरादा… विंग कमांडर अभिनंदनवर करणार विनोदी चित्रपटाची निर्मिती

पाकिस्तानी लेखक खलिल-उर-रहमान-कमर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत

काही दिवसापूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉयने बालाकोट आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं जाहीर केलं. या चित्रपटामधून विवेक अभिनंदन यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखविणार आहेत. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानमध्ये अभिनंदन यांच्यावर आधारित एका विनोदी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. मात्र त्या परिस्थितीमध्येही ते खंबीर आणि तेवढ्याच निडरतेने उभे राहिले, त्यामुळे अभिनेता विवेक ओबेरॉय अभिनंदन यांच्या जीवनावर आणि बालाकोटवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी विवेकने हवाईदलाकडून चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकारही मिळविले आहेत. मात्र, आता पाकिस्तानने अभिनंदन यांच्यावर आधारित विनोदी चित्रपट निर्मिती करण्याची तयारी केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लेखक खलिल-उर-रहमान-कमर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून चित्रपटाची कथादेखील तेच लिहिणार आहेत. अभिनंदन यांच्यावर आधारित या विनोदीपटाचं नाव “अभिनंदन कम ऑन” असं ठेवण्यात आलं आहे. तर अभिनेता शमूम अब्बासी हा या चित्रपटामध्ये अभिनंदन यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आली नसली तरीदेखील सप्टेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२० रोजी पाकिस्तानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 11:43 am

Web Title: pakistan to make a comic film on iaf abhinandan after bollywood plans one on balakot ssj 93
Next Stories
1 या चित्रपटामधून अमरिश पुरी यांचा नातू करणार सिनेसृष्टीत पदार्पण
2 बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही रजनीकांतची कमाई अधिक , वाचून बसेल धक्का
3 एकदा नाही तर दोनदा झालं होतं रानू मंडल यांचं लग्न? जाणून घ्या खरं कारण
Just Now!
X