News Flash

#MeToo वरील आरोपांवर बोलताना अली जफरला कोसळलं रडू

माझं करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अलीने केला आहे.

अली जफर

#MeToo (मीटू) मोहिमेअंतर्गत झालेल्या आरोपांवर बोलताना पाकिस्तानी गायक-अभिनेता अली जफरला रडू कोसळलं. पाकिस्तानी गायिका मीशा शफीने गेल्या वर्षी अलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या आरोपांवर बोलताना अली जफरला अश्रू अनावर झाले.

मीशाने केलेले आरोप फेटाळत तो म्हणाला, ‘ती असं का करतेय हे मला नाही माहीत. तिच्या आरोपांमुळे फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबीयांना, माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीलाही त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात मी या आरोपांवर एक शब्दही बोललो नाही कारण कायदेशीर पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचा निर्णय मी घेतला होता. पण फेक अकाऊंट तयार करून प्रत्येकाला टॅग करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, माझं करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

‘स्वत:ला या सगळ्या गोष्टींपासून दूर घेऊन जा, देवाच्या संपर्कात ये आणि हे संपूर्ण प्रकरण संपव. तू जर एक पाऊल पुढे टाकलंस, तर मी दहा पावलं पुढे टाकीन,’ असं त्याने मीशाला उद्देशून म्हटलं.

अलीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं मीशाने सोशल मिडीयामध्ये सांगितलं होतं. तसंच #Me Too हा हॅशटॅग वापरत तिच्यावर झालेल्या अन्यायाला तिने वाचा फोडली होती. मात्र मीशाने केलेले आरोप अलीने फेटाळले असून त्याने तिच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा ठोकला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 5:33 pm

Web Title: pakistani actor singer ali zafar breaks down while talking about sexual harassment claims against him by meesha shafi
Next Stories
1 सलमान-फरहान करणार एकत्र काम?
2 १९ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्काराची नामांकनं जाहीर
3 Video: अमेरिकी दूतावासातील आर्ची, लाल्या, माऊलीची भन्नाट डायलॉगबाजी
Just Now!
X