News Flash

इरफानपुढे शाहरुखचा अभिनयही फिका; पाकिस्तानी अभिनेत्रीने वाहिली आदरांजली

इरफानच्या निधनामुळे पाकिस्तानी कलाकार देखील दु:खी

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री हुमाइमा मलिक हिने ट्विटच्या माध्यमातून इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “…म्हणून ऋषी कपूर यांना भेटायला रुग्णालयात गेलो नाही”; बिग बींनी केला खुलासा

“किती दुःखद बातमी आहे. इरफान एक उत्कृष्ट अभिनेता होता. असा अभिनेता बॉलिवूडमध्ये पुन्हा कधीही येणार नाही. किंबहूना इरफान खानच्या अभिनयासमोर शाहरुखचा अभिनय अगदीच फिका वाटायचा.” अशा आशयाचे ट्विट हुमाइमाने केले आहे.

हुमाइमा मलिकने ‘राजा नटवरलाल’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता इमरान हाशमीने मुख्य भूमिका साकारली होती. हुमाइमाच्या बोल्ड सीनमुळे हा चित्रपट चर्चेत होता.

३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 1:34 pm

Web Title: pakistani actress humaima malick mourns over irrfan khans death mppg 94
Next Stories
1 Video : ‘त्यांचे पगार कापू नका’ ; कलाकारांचं जनतेला भावनिक आवाहन
2 “…म्हणून ऋषी कपूर यांना भेटायला रुग्णालयात गेलो नाही”; बिग बींनी केला खुलासा
3 ऋषी कपूर यांच्या मुलीनं व्हिडीओ कॉलद्वारे पाहिले अंत्यसंस्कार, म्हणून आलियाच्या हाती होता मोबाइल
Just Now!
X