बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. पंकज त्रिपाठी यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पाकिस्तामधील एक लोकप्रिय अभिनेत्री देखील पंकज त्रिपाठी यांची चाहती आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे.
पाकिस्तानमधील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री इकरा अजीज ही पंकज त्रिपाठी यांची मोठी चाहती आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीमध्ये ‘कालीन भैय्या’ फेम पंकज त्रिपाठी यांचा फोटो शेअर केला होता. ‘हाय कालीन भैय्या मी तुमची खूप मोठी चाहती आहे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.
View this post on Instagram
इकराच्या या पोस्टवर पंकज त्रिपाठी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी इकराच्या या स्टोरीला उत्तर देत हात जोडलेले इमोजी वापरले आहेत. त्यानंतर इकराने स्क्रीनशॉट घेऊन पुन्हा इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने ‘पंकज यांनी माझ्या स्टोरीला उत्तर दिले यावर माझा विश्वासच बसत नाही’ असे तिने म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 6:16 pm