News Flash

…जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ‘आई हूं यूपी-बिहार लूटने’ गाण्यावर थिरकते

माहिरा खान नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान तिने दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. माहिराने मुलाखतीत म्हटले होते की, तिला कधी बॉलिवूडमध्ये काम करायचे नव्हते. पाकिस्तानी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यालाच ती प्राधान्य देत आली आहे. या वादग्रस्त विधानानंतर माहिराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माहिरा ‘आई हूं यूपी-बिहार लूटने’ या गाण्यावर डान्स करताना दिसते. माहिराने या व्हिडिओत हिरव्या रंगाचा लेहंगा घातला आहे.

शूल सिनेमातील हे गाणे शिल्पा शेट्टीवर चित्रीत करण्यात आले आहे. आजही या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळते. माहिराचा या गाण्यावरचा डान्स तिच्या चाहत्यांना आवडत आहे. सोशल मीडियावर हा डान्स मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे. माहिराने रईस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुखचा रईस बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

माहिरा खान नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी माहिराने एका मुलाखतीत जगभरात फिरताना पाकिस्तानी असल्याचा अनुभव कथन केला. विमानतळावर चौकशी दरम्यान पाकिस्तानी असल्यामुळे तिला कसा अपमान सहन करावा लागला याचे सविस्तर वृत्त तिने एका मुलाखतीत दिले. या मुलाखतीशिवाय रणबीर कपूरसोबतच्या अफेअर्सच्या चर्चांनीही तिचे नाव अनेकांच्या ओठी होते. माहिरा मुळची पाकिस्तानी असून तिला एक मुलगाही आहे. २००६ मध्ये लॉस अँजेलिसमध्ये माहिराची ओळख अली नावाच्या एका व्यक्तिशी झाली होती. कुटुंबाच्या विरोधात जाऊन माहिराने अलीशी लग्न केले. पण लग्नाच्या आठ वर्षांनंतर अली आणि माहिरा वेगळे झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 4:06 pm

Web Title: pakistani actress mahira khan new dance video viral watch video
Next Stories
1 बिग बींनी पुन्हा एकदा धरली दक्षिणेची वाट
2 VIDEO : वडीलच मुलाला वृद्धाश्रमात पाठवतात, असं कुठे असतं का?
3 सलमानच्या ‘त्या’ कमेंटवर दीपिकानं सुनावले खडे बोल
Just Now!
X