News Flash

कियारा अडवाणीची पाकिस्तानमध्येही क्रेझ; ‘या’ अभिनेत्रीने केली तिची कॉपी

कोण असेल ही अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची क्रेझ केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. या कलाकारांमध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश होतो. आतापर्यंत दिपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय-बच्चन या अभिनेत्रींची लोकप्रियता विदेशात होती. मात्र याच अभिनेत्रींच्या यादीमध्ये आता अभिनेत्री कियारा अडवाणीचा देखील समावेश झाला आहे. कियाराची लोकप्रियता चक्क पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे काही पाकिस्तानी कलाकारदेखील तिचे चाहते असून एका पाकिस्तानी अभिनेत्रीने तिची स्टाइल कॉपी केल्याचं दिसून येत आहे. मात्र ही स्टाइल कॉपी केल्यामुळे या अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल व्हावं लागलं आहे.

शाहरुख खानसोबत ‘रईस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री माहिरा खान साऱ्यांच्याच लक्षात असेल. माहिरा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडिओज शेअर करत असते. यामध्येच तिने बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर तिने अभिनेत्री कियारा अडवाणीला कॉपी केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Self-love is a superpower. When things change inside you, things change around you. Happy Valentine’s Day!

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

माहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने एका मोठ्या हॅटच्या (टोपी) माध्यमातून चेहरा झाकून घेतला आहे. विशेष म्हणजे सेम याचप्रकारे काही दिवसांपूर्वी कियाराने एक फोटो शेअर केला होता. ‘अरे हिने तर कियाराला कॉपी केलंय’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Parathas and burgers got to me

A post shared by Mahira Khan (@mahirahkhan) on

दरम्यान, माहिरा ही पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिचा बॉलिवूडमधील वावरही आता चांगलाच वाढला आहे. काही काळापूर्वी तिच्या आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यातील मैत्रीमुळे कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. परंतु रणबीर सध्या आलिया भट्टला डेट करत असल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 10:55 am

Web Title: pakistani actress mahira khan shared photo fans says copy of kiara advani ssj 93
Next Stories
1 Coronavirus : कोणी हात मिळवण्याचा प्रयत्न केल्यास करीना करते ‘हे’ काम
2 अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव; गायिकेविरोधात FIR दाखल
3 प्रेमासाठी वाट्टेल ते! हेमामालिनीसाठी धर्मेंद्रंनी केलं होतं अख्खं रुग्णालय बूक
Just Now!
X