पाकिस्तानी अभिनेत्री मीरा गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांचा सामना करत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री मीराने सिनेमांसोबत पाकिस्तानी टेलिव्हिजनवरील अनेक शोमध्ये काम केलंय. मात्र आता मीरा एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. जमीनीच्या वादातून आईचं अपहरण केलं असल्याचा आरोप मीराने एका व्यक्तीवर केलाय. या प्रकरणी मीराने शहर पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. एवढचं नाही तर मीराने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना देखील या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केलीय.

मीराने अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलंय. त्यामुळे पाकिस्तान सोबतच भारतातही तिचे चाहते आहेत. मीराने स्वत: आईच्या अपहरणाची बातमी दिलीय. पाकिस्तानातील वेबसाइट एक्सप्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत मीराने या गोष्टीचा खुलासा केलाय. आपल्या करोडो रुपयांच्या संपत्तीवर अवैद्यरित्या काही जण हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मीराने केलाय. ज्यासाठी मीराने पंतप्रधानांकडे मदतीची याचना केलीय.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

पहा फोटो: “कोला शोला सब अपनी जगह”; रोनाल्डोच्या अनेक वर्ष आधीच करीना कपूर Coca-Cola बद्दल म्हणाली होती…

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera (@meerajeeofficial)

हे देखील वाचा: “सकाळची लाळ त्वचेसाठी गुणकारी”; अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या चाहत्यांना टिप्स

या मुलाखतीत मीरा म्हणाली, ” जमीन बळकावू पाहणारे मियां शाहिद मला धमकी देत आहेत. शिवाय भाडेकरू म्हणून राहत असून ते बेकायदेऱीरपणे माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यक्तीने माझ्या आईचं अपहरण केलं असून आता माझ्या कुटुंबाची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. मी लाहोरच्या सीसीपीओमध्ये तक्रार केली असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे मदतीची मागणी केली आहे.” असं ती म्हणाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीराची पाकिस्तानमधील लाहोरमध्ये असलेल्या संपत्तीची किंमत 200 मिलियन पाकिस्तानी रुपये इतकी आहे. तर मीराने ज्या व्यक्तीवर आरोप केले आहेत.त्या मियां शाहिद यांनी हे आरोप फेटाळले असून आपण ही संपत्ती मीराच्या आईकडून खरेदी केल्याचा दावा केलाय. सध्या पोलिस या प्रकणाची चौकशी करत आहेत.