News Flash

अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला तीन वर्षांचा तुरुंगवास

जाणून घ्या सविस्तर...

प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार अली जफरविरोधात पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री मीशा शफीने लैंगिक अत्याचाराचा काही दिवसांपूर्वी आरोप केला होता. ट्विटरच्या माध्यमातून अली जफरने आरोप फेटाळत खोट्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे.

अली जफरला कोर्टाकडून या प्रकरणी मोठा दिला मिळाला आहे. मीशाने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच अलीने मीशा विरोधात मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणी कोर्टाने मीशाना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
पाकिस्तानी गायिकेने ट्विटरच्या माध्यमातून अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. ‘मी आणखी शांत बसू शकत नाही. माझ्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल मी उघडपणे बोलली तर आपल्या समाजातील शांत बसण्याची वृत्ती संपेल असे मला वाटते. आवाज उठवणे सोपे नसते, पण शांत बसणे हे त्याहून कठीण असते,’ असे तिने म्हटले होते.

दरम्यान ट्विटरच्या माध्यमातून अली जफरने आरोप फेटाळत खोट्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ‘मी एका तरुण मुलाचा आणि मुलीचा पिता आहे, एकीचा पती आहे आणि एका आईचा मुलगा आहे. टीका, बदनामी किंवा अन्यायाविरोधात मी कुटुंबासाठी, स्वत:साठी, मित्रांसाठी किंवा सहकाऱ्यांसाठी अनेकदा खंबीरपणे उभा राहिलो आहे. त्या महिलेने माझ्यावर जे आरोप केले त्या विरोधात इथे कुठलेही प्रतिदावे न करता कायदेशीर कारवाई करण्याचा आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तर देण्याचा निर्णय मी घेतला आहे,’ असे अलीने ट्वीटमध्ये स्पष्ट केले होते.

अली जफरने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चश्मेबहाद्दूर’, ‘टोटल सियापा’, ‘किल दिल’, ‘डिअर जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 3:05 pm

Web Title: pakistani actress meesha shafi faces three years in jail who accused ali zafar of sexual harassment avb 95
Next Stories
1 कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात एफआयआर दाखल; कथाचोरीचा आरोप
2 ‘या’ ५ गोष्टींमुळे आमिर खान आहे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट…
3 अप्पांचा मॉडर्न अवतार…; केतकर कुटुंबीय झाले थक्क
Just Now!
X