‘दिल ना उम्मीद ही सही’ या पाकिस्तानी मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सबा बुखारी. तिने नुकताच ‘बीबीसी उर्दू’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने भूमिका मिळवण्यासाठी निर्मात्यांनी त्यांच्यासोबत झोपण्यास सांगितले असल्याचा खुसाला करत पाकिस्तानी इंडस्ट्रीमधील सत्य सांगितले आहे.
‘मला मालिकेत एक चांगला रोल मिळाला होता. पण रोल दिल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, रोल तर तुम्हाला मिळाला पण यापेक्षा चांगला रोल आणि पैसे तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल’ असे सबा म्हणाली.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, ‘मला असे वाटले की त्यांना पैसे हवे आहेत. मी त्यांना म्हटले हो, जर तुम्हाला पैसे हवे असती तर मी देते. पण नंतर ते म्हणाले तुम्हाला चांगला रोल आणि पैसे हवे असतील तर माझ्यासोबत झोपावे लागेल. ते ऐकून मला धक्काच बसला. मी फोन ठेवून दिला. असे पहिल्यांदाच झालेले नाही. अनेक लोकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी वाईट घटना घडत असतात ‘
View this post on Instagram
सबाने या संदर्भात इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने इन्स्टाग्रामवर माझे फॉलोअर्स जास्त नाहीत. पण या पोस्टनंतर मला अनेकांचा पाठिंबा नक्की मिळाला. मला कळत नव्हते की लोकं मला कसे पाठिंबा देणार. पण मी आनंदी आहे. कोणीतरी मला सांगितले होते की काम मिळवण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय रहावे लागते असे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 26, 2021 5:26 pm