भारताविरोधात विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून गरळ ओकणारी पाकिस्तानी अॅक्ट्रेस वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वीणा मलिकने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती पाकिस्तान झिंदाबाद आणि ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणाही देताना दिसत आहे. वीणा मलिकच्या या व्हिडीओनंतर भारतीय यूझर्सनी संताप व्यक्त केला आहे.

वीणा मलिकच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे, अस कमेंट करत एका युझरने आपला संताप व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या युझरने तुझं स्वप्न हे स्वप्न राहणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच आणखी एका युझरने कमेंट करत भारताच्याच पैशावर तुझं घर चालत असल्याच म्हणत संताप व्यक्त केला आहे.

आणखी एका युझरने कमेंट करत तू काश्मीरची वाट पाहत आहेस, अजून लाहोर घेणंही बाकी आहे असं म्हटलं आहे. तुमच्याने एक युद्ध जिंकलं जात नाही आणि तुम्ही काश्मीर मागत आहात, अशाप्रकारचं कमेंट केलं आहे. यापूर्वी काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर वीणा मलिकने ट्विट केलं होतं. त्यानंतरही ती ट्रोल झाली होती. वीणा मलिकच्या त्या वक्तव्यानंतर ती आणि पायल रोहतगी या दोघी सोशल मीडियावर भिडल्याचे पहायला मिळाले होते.