News Flash

पाकिस्तानी रॅपरने आलिया भट्टवर बनवला रॅप, व्हिडिओ पाहून आलिया म्हणाली…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सगळ्यांची मने जिंकली आहेत. लहानांमुलांपासून मोठ्यांपर्यंत तिचे लाखो चाहते आहेत. आता पाकिस्तान मधील एका रॅपरने आलियावर एक रॅप तयार केला आहे. त्याचा हा रॅप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, आलियाने स्वत: यावर कमेंट देखील केली आहे.

या रॅपरचे नाव मोहम्मद शाह आहे. त्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरूवातीला त्याचा मित्र त्याला म्हणतो की, ‘आलियावर गाणं बनव’, त्यानंतर मोहम्मद आलियावर रॅप गातो. रॅपच्या शेवटी त्याचा मित्र त्याला सांगतो की ‘आलियाचा बॉयफ्रेंड आहे, आणि त्याने जान्हवी कपूरवर गाणं बनवायला ट्राय करायला पाहिजे.’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता जान्हवीवर पण लवकरचं गाणं येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘What if चा हा पहिला भाग…’, अशा आशयाचे कॅप्शन मोहम्मदने हे गाणं शेअर करत दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आलिया स्वत: ला थांबवू शकली नाही आणि तिने देखील यावर कमेंट केली. आलियाने गली बॉयमधील ‘बहुत हार्ड’ हा डायलॉग म्हणत मोहम्मदची स्तुती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Muhammad Shah (@iamtheshah)

दरम्यान, करोना निगेटिव्ह आल्यानंतर आलिया आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूर दोघे ही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीव्हला गेले आहेत. तर ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात आलिया पहिल्यांदा रणबीर सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. एवढंच नाही तर आलियाला ‘गंगुबाई’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांमध्ये देखील आपल्याला पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 10:26 am

Web Title: pakistani rapper muhammad shah made rap song on alia bhatt dcp 98
Next Stories
1 “..दिखावा करण्याची गरज नाही”; फिरायला जाणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुति हसन नाराज
2 प्रसादाच्या थाळीतील कांद्यावरून कंगना ट्रोल; नेटकऱ्यांना म्हणाली, “..थट्टा करू नका”
3 अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन
Just Now!
X