News Flash

बिकिनीत दिसली ‘Ertugrul Ghazi’मधील अभिनेत्री, पाकिस्तानी चाहत्यांनी केले ट्रोल

तिचा हा व्हिडीओ ऑगस्ट २०१९मधील आहे

करोना व्हायरसमुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांच्या मनोरंजनासाठी अनेक जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानमध्ये देखील तुर्किश इतिहासाशी संबंधित काल्पनिक सीरिज उर्दुमध्ये डब करुन दाखवण्यात आली होती. या Ertugrul Ghazi सीरिजने पाकिस्तानमध्ये रेकॉर्ड केला होता. ही सीरिज तेथ लोकप्रिय ठरली. तसेच सीरिजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे देखील पुन्हा कौतुक करण्यात आले. पण या सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री Burcu Kiratli हिला बिकिनी परिधान केल्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

Burcu Kiratliने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने बिकिनी परिधान केली असून तू स्विमिंग पूलमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ ऑगस्ट २०१९मधील आहे. पण Ertugrul Ghazi ही सीरिज पुन्हा प्रदर्शित केल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी अभिनेत्रीला त्या व्हिडीओवरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Burcu Kıratlı (@burcukiratli23) on

त्यानंतर अभिनेत्रीने बिकिनीमधील आणखी एक फोटो शेअर केला. या वेळी तिने सर्वांसाठी असलेला कमेंट बॉक्स बंद केला. आता ती फॉलो करत असलेल्याच व्यक्ती फक्त तिच्या फोटोवर कमेंट करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 8:35 pm

Web Title: pakistani trolls attack ertugrul ghazi actress burcu kiratli for posing in bikini avb 95
Next Stories
1 ‘कुली नंबर १’ होणार सुपरफ्लॉप? अभिनेत्याच्या ऑनलाईन सर्वेमध्ये वरुणला नापसंती
2 लाव रे तो व्हिडीओमध्ये ‘मुळशीपॅटर्न’मधील पिट्ट्याभाईची एण्ट्री
3 रिअ‍ॅलिटी स्टार बनण्यासाठी आला आहात का? फरहानची अभय देओलवर खोचक टीका
Just Now!
X