28 November 2020

News Flash

कातिलाना अदा! पलक तिवारीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

घायाळ करणारे पलक तिवारीचे फोटो

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची लेक पलक तिवारी यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. अनेकदा या मायलेकी त्यांचे व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यामुळे श्वेतासोबतच पलकची लोकप्रियतादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. पलक बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते. यावेळीदेखील तिने असंच एक नवीन फोटोशूट केलं असून त्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पलकने हे खास नवीन फोटोशूट एका मासिकासाठी केल्याचं दिसून येत आहे.

पलकने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. हे फोटो तिने बीचवर काढले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून तिच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

Shot by @chrisrathore.photo

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

 

View this post on Instagram

 

Shot by @chrisrathore.photo

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

दरम्यान, पलक लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. अलिकडेच तिच्या ‘रोजी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विवेक ओबेरॉय स्क्रीन शेअर करणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल मिश्रा करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:02 pm

Web Title: palak tiwari daughter of shweta tiwari latest glamorous photoshoot ssj 93
Next Stories
1 “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल
2 अशी सुरू झाली माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी
3 ‘अन् मग मी सोडून त्रिशूळ, भाला.. हाती stethoscope धरला…’; तेजस्विनी नवदुर्गेचा डॉक्टरांना अनोखा सलाम
Just Now!
X