News Flash

मुलीने चित्रपटात इंटिमेट सीन्स देण्यावर श्वेता तिवारीची कशी होती प्रतिक्रिया, पलक तिवारीने केला खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलकने हा खुलासा केला आहे.

palak tiwari, shweta tiwari,
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलकने हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलक लवकरच ‘रोजी: द सॅफ्रन चॅप्टर’ या हॉरर थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई श्वेताची चित्रपटातील तिच्या इंटिमेटसीनवर कशी प्रतिक्रिया आहे ते सांगितलं आहे.

पलकने नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पलकने आई श्वेता तिवारीच्या प्रतिक्रिविषयी सांगितले आहे. ‘ती माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. मला माझ्या आईची एक गोष्ट आवडते की ती मला नेहमी सांगते की हे तुझं काम आहे. त्यामुळे हा तुझा निर्णय असला पाहिजे. तुझे निर्णय घेण्यासाठी तू हुशार आहे असे ती म्हणते. मला वाटतं की तिला माझ्यावर खूप विश्वास आहे. पण जर मी कधी गोंधळले तर मी तिच्याकडे जाते आणि ती मला सल्ला देते. ती म्हणते की मला जे आवडलं ते मी करायला पाहिजे,’ असे पलक म्हणली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

आणखी वाचा : “मी पॅन्टवर अंडरवेअर परिधान केली तेव्हा मला…” प्रियांका चोप्राचं ‘त्या’ प्रश्नावर मजेशीर उत्तर

पुढे पलक ‘रोजी’ हा चित्रपट निवडण्याविषयी म्हणाली, ‘मी माझ्या आई प्रमाणे छोट्या पडद्यावर पदार्पण करत अभिनय क्षेत्रात येईल असे लोकांना वाटत होते. ही कहानी सत्य घटनेवर आधारीत असल्याने मी हा प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या करिअरची सुरुवात एका हॉरर चित्रपटातून करायची होती. मला ज्या कहाणीवर पूर्ण विश्वास आहे, त्यातून मला माझ्या करिअरची सुरुवात करायची होती.’

आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा

‘रोजी: द सॅफ्रन चॅप्टर’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. रोजी नावाची एक मुलगी कॉल सेंटरमध्ये काम करत असते आणि त्यानंतर ती अचानक गायब होते. तर या चित्रपटात पलक त्याच मुलीची भूमिका साकरत आहे. या चित्रपटात पलकसोबत विवेक ओबेरॉय, अरबाज खान आणि मल्लिका शेरावत देखील दिसणार आहेत. पलकचा अजुन कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत पलक चाहत्यांच्या संपर्कात राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 4:52 pm

Web Title: palak tiwari told about mother shweta tiwari s reaction on doing intimate scene in movie dcp 98
Next Stories
1 ‘कारभारी लयभारी’ फेम प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये सहभागी होणार?
2 स्टार प्रवाहच्या कलाकारांचा जल्लोष, पारंपरिक पद्धतीने होणार गणरायाचं स्वागत
3 Video: शमिताने राकेशच्या खिश्यात दिव्याचे लिप बाम पाहिले अन्…
Just Now!
X