News Flash

देवा मला आणखी एकदा लग्न करायचं, तीन लग्नांनंतर चौथ्या लग्नासाठी अभिनेत्रीची देवाकडे विनंती

एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे.

हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रावर निशाणा साधला होता. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा तिने चौथ्या लग्नाची इच्छा व्यक्त केल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

नुकताच पामेलाने न्यूयॉर्क टाइम्स मॅगझीनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा तिने चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘माझे तीन वेळा लग्न झाले आहे. पण अनेकांना असं वाटतं की माझे पाच वेळा लग्न झाले आहे. माहित नाही का. माझे लग्न टॉमी लीशी झाले. त्यानंतर मी बॉब रिचीशी लग्न केले. नंतर मी रिक सॅलमनसोबत लग्न केले. माझी तीनच लग्न झाली आहेत. मला माहित आहेत तीन लग्न देखील खूप आहेत पण पाच पेक्षा तरी कमीच आहे’ असे पामेला म्हणाली.

View this post on Instagram

Nothing is secure …

A post shared by Pamela Anderson (@pamelaanderson) on

नंतर तिला पुन्हा लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने, ‘का नाही? आता फक्त एकदा. देवा आता फक्त एकदा मला लग्न करायचे आहे’ असे तिने उत्तर दिले आहे.

सर्वप्रथम पामेलाने १९९५ साली अभिनेता टॉमी लीसोबत लग्न केले होते. मात्र तिने त्याला तीन वर्षानंतर १९९८ साली घटस्फोट दिला. त्यानंतर २००६ साली बॉब रिचीशी लग्न केले, त्याला २००७ साली तिने घटस्फोट दिला. त्यानंतर २००७ साली अमेरिकन पोकर खेळाडू रिक सॅलमनसोबत तिने लग्न केले, मात्र त्यालाही एकाच वर्षात तिने घटस्फोट दिला. आता तिने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

pamela anderson is ready for fourth marriage says only one more time god avb 95

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 9:13 pm

Web Title: pamela anderson is ready for fourth marriage says only one more time god avb 95
Next Stories
1 गश्मीरचे वेब विश्वात पदार्पण, लवकरच दिसणार या वेब सीरिजमध्ये
2 ‘या’ कलाकारांनी टाकला चिनी वस्तूंवर बहिष्कार
3 “या चीनचं काहीतरी करा”; रिचा चड्ढाने केली अमित शाहांवर टीका
Just Now!
X