News Flash

“प्रियांकाचा तो चित्रपट कंटाळवाणा”; पामेलाने ‘देसी गर्ल’ची उडवली खिल्ली

प्रियांका चोप्राला लगावला उपरोधिक टोला

आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन सध्या प्रियांका चोप्रामुळे चर्चेत आहे. प्रियांकाने तीन वर्षांपूर्वी ‘बेवॉच’ या चित्रपटात काम केलं होतं. मात्र हा चित्रपट पामेलाला बिलकूल आवडला नाही. किंबहूना प्रियांकाच्या जागी मी असते तर आणखी चांगला अभिनय केला असता असा टोला तिने लगावला आहे.

हा चित्रपट १९९० सालच्या बेवॉच या मालिकेवर आधारित आहे. या मालिकेमुळे पामेलाला तुफान लोकप्रियता मिळाली होती. तिला आजही ‘बेवॉच गर्ल’ म्हणूनच ओळखलं जातं. पामेलाने या मालिकेत सी. के. पारकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु चित्रपटामध्ये या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री किली रोहबॅचची निवड करण्यात आली. शिवाय प्रियांका चोप्राची व्यक्तिरेखा वाढवण्यात आली. निर्मात्यांचा हा निर्णय पामेलाला बिलकूल आवडला नाही. अँडी कोहेनला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रियांकाला उपरोधिक टोला लगावला.

ती म्हणाली, “बेवॉच चित्रपट अत्यंत कंटाळवाणा आहे. या चित्रपटाची कथा प्रियांका चोप्रा आणि ड्वेन जॉन्सन यांच्याभोवतीच फिरते. इतर कलाकार केवळ जागा भरण्यासाठी घेतले होते का? असा प्रश्न पडतो. प्रियांकाने या चित्रपटात खूपच खराब अभिनय केला आहे. तिच्या ऐवजी मी असते तर हा चित्रपट सुपरहिट ठरला असता.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 1:38 pm

Web Title: pamela anderson says she didnt like priyanka chopras baywatch film mppg 94
Next Stories
1 ‘दीपिकाला फूलं देण्यासाठी किती खर्च करतोस’? वडिलांच्या प्रश्नावर रणवीरचं थक्क करणारं उत्तर
2 सोनू सूदला पद्मविभूषण देण्याची मागणी, आपल्या उत्तराने अभिनेत्याने जिंकलं चाहत्यांचं मन
3 “स्वप्नांच मरणं अत्यंत त्रासदायक असतं”; अभिनेत्रीच्या आत्महत्येवर करण कुंद्राची प्रतिक्रिया
Just Now!
X