News Flash

एका लग्नाची चौथी गोष्ट; १२ व्या दिवशी झाला घटस्फोट

तिने लग्न केल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत पतीला घटस्फोट दिला.

हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी पामेला तिच्या घटस्फोटीत पतीमुळे चर्चेत आहे. कारण पामेलाने लग्न केल्यानंतर अवघ्या बारा दिवसांत पतीला घटस्फोट दिला.

गेल्या अनेक महिन्यांपासून पामेला चित्रपट निर्माते जॉन पीटर्स यांना डेट करत होती. एके दिवशी ७२ वर्षीय जॉनसोबत पामेलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगदी घरातल्या घरात एक लहानसा समारंभ आयोजित करुन त्यांनी लग्न केले. मात्र लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यात मतभेद सुरु झाले. त्यांचे लग्न केवळ ११ दिवस टिकले. परिणामी १२ व्या दिवशी त्यांनी घटस्फोट घेतला.

आश्चर्याची बाब म्हणजे जॉन पीटर्स तिचा चौथा पती होता. सर्वप्रथम तिने १९९५ साली अभिनेता टॉमी लीसोबत लग्न केले होते. मात्र तिने त्याला तीन वर्षानंतर १९९८ साली घटस्फोट दिला. त्यानंतर २००६ साली दिग्दर्शक किड रॉकसोबत लग्न केले, त्याला २००७ साली तिने घटस्फोट दिला. त्यानंतर २००७ साली अमेरिकन पोकर खेळाडू रिक सॅलमनसोबत तिने लग्न केले, मात्र त्यालाही एकाच वर्षात तिने घटस्फोट दिला. गंमतीशीर बाब म्हणजे २०१४ साली त्यांनी पुन्हा एकदा संसार थाटला होता, मात्र अंतर्गत मतभेदांमुळे एकच वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. आणि आता चौथा पती जॉन पिटर्स यांना देखील तिने घटस्फोट दिला.

५२ वर्षीय पामेलाला दोन मुलं आहेत. या मुलांच्या आग्रहाखातर तिने पुन्हा एकदा संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तिचा निर्णय चुकला. असे पामेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 5:08 pm

Web Title: pamela anderson splits from husband 12 days after wedding mppg 94
Next Stories
1 रसिकाच्या बोल्ड फोटोंवर अमेय वाघची अतरंगी कॉमेंट
2 ‘थप्पड’ मारणाऱ्या पतीविरोधात महिला करणार तक्रार
3 अमिताभ यांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या दिग्दर्शकाला दिलं आव्हान
Just Now!
X