जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. ते ८५ वर्षांचे होते. अंबरनाथ इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पंडित दिनकर पणशीकर यांचा जन्म १९३६ साली झाला होता. ते ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू होते. घरामध्येच कलेचं वातावरण असल्यामुळे त्यांचाही ओढा कलेकडेच होता. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. दत्तात्रय कुंटे यांच्या तालमीत त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून तब्बल १० वर्ष शिक्षण घेतलं आणि जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली.

Saleel Kulkarni Shared special post for son shubhankar kulkarni
“आमच्या शुभूने…”, सलील कुलकर्णींची मुलासाठी खास पोस्ट; त्याचं पहिलं हिंदी गाणं येतंय श्रोत्यांच्या भेटीला
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..

गायनासोबतच त्यांना अभिनयातही रुची होती. शास्त्रीय गायक असलेल्या पणाशीकरांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. शिवाय ‘आडा चौताला’ सारख्या प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. पंडित दिनकर पणशीकर यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.