News Flash

स्मिता तांबेने शेअर केल्या तिच्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी

पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं.

स्मिता तांबे

पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या बालपणीचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जुन्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला. जो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या पहिल्या फोटोशूटविषयी सांगते, ” माझ्या आई बाबांनी फार हौशीने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. खरं तर त्यांनी माझ्यासाठी खास ड्रेस शिवून घेतला होता. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की माझं फोटोशूट स्टुडिओतच करायचं. पाठीमागे काश्मीरचं बॅकग्राऊंड होतं. मला लहानपणी वाटायचं आपण खरंच काश्मीरला गेलो होतो. पण तो फोटो स्टुडिओत काढला होता. तो फोटो माझा आवडता फोटो आहे.”

आणखी वाचा :निवेदिता यांनी सांगितली अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी; पाहा ‘हा’ खास फोटो

पुढे ती तिच्या आई-वडिलांविषयी सांगते, “आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्याक्षणी आपले आई-वडीलचं आपल्या सोबत असतात. ते आपल्याला सांभाळतात. या क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे फार वेळं आहे तर हा वेळ आपण स्वत:साठी देऊया आणि आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. त्यांची आठवणं काढुयात.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 4:53 pm

Web Title: panga fame marathi actress smita tambe shared her first photo shoot memories ssv 92
Next Stories
1 ‘गॉन केस’; कुशलचा नवा लूक पाहून चाहते हैराण
2 लॉकडाउनमध्ये बाहेर बिनधास्त फिरतेय ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
3 थेट अंतराळात करणार स्टंटबाजी; अभिनेत्याची नासासोबत तयारी सुरु
Just Now!
X