News Flash

कंगना रनौतने घेतला विराट कोहलीशी पंगा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच विविध क्षेत्रातील लोकांवर आपल्या तिखट शब्दांनी हल्ला करताना दिसते. यावेळी बॉलिवूडच्या या क्विनने चक्क भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीशी पंगा घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने विराटचे नवे नामकरण केले आहे.

विराट कोहली हा अत्यंत आक्रमक खेळाडू आहे. मैदानावर तो नेहमीच प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घेताना दिसतो. त्यामुळे कंगनाने त्याचे नवे नाव ‘पंगों का सरताज’ असे ठेवले आहे. याचा अर्थ प्रतिस्पर्धी खेळाडूंशी थेट भिडणारा कर्णधार असा होतो.

कंगना रनौत सध्या ‘पंगा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कबड्डी या खेळावर आधारित आहे. ‘पंगा’ येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 6:25 pm

Web Title: panga kangana ranaut virat kohli mppg 94
Next Stories
1 दीपिका पदुकोणने रचला इतिहास; ठरली असा विक्रम करणारी पहिली भारतीय स्त्री
2 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 अतुल गोगावले लवकरच दिसणार नव्या रुपात
Just Now!
X