12 August 2020

News Flash

‘पानिपत’ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

आठवड्याअखेर चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता

पानिपत

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ठिकठाक कमाई केली आहे. मात्र समीक्षकांकडून चित्रपटाचं कौतुक झाल्याने पुढील काही दिवसांत त्याच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘पानिपत’ने शुक्रवारी ४.१२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट जवळपास तीन तासांचा असल्याने मल्टिप्लेक्समध्ये शो टाइम देताना थिएटर मालकांना विचार करावा लागत असल्याचंही त्याने म्हटलंय. याच दिवशी कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९.१० कोटी रुपये कमावले आहेत. कार्तिकचा हा सलग पाचवा हिट चित्रपट ठरतोय.

आणखी वाचा : एक हिट चित्रपट देऊन गायब झाली ‘तुम बिन’ची अभिनेत्री; आता सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय

‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटात अर्जुन सदाशिवराव भाऊ, क्रिती पार्वतीबाई आणि संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. याशिवाय चित्रपटात बरेच मराठी कलाकार आहेत. अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झालेले हे युद्ध रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न गोवारीकरांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 3:09 pm

Web Title: panipat box office collection day 1 ashutosh gowariker arjun kapoor kriti sanon sanjay dutt ssv 92
Next Stories
1 एक हिट चित्रपट देऊन गायब झाली ‘तुम बिन’ची अभिनेत्री; आता सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय
2 नाट्यगृहांमध्ये बसवणार जॅमर!
3 पहिल्या जॉबमध्ये कियाराला बदलावे लागले लहान मुलांचे डायपर्स
Just Now!
X