21 September 2020

News Flash

“चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय?”; पंकज त्रिपाठीचा प्रेक्षकांना टोला

बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून प्रेक्षकांना टोला लगावला आहे.

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठीने चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून प्रेक्षकांना टोला लगावला आहे. एखाद्या चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले, हे जाणून घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे, असा सवाल त्याने प्रेक्षकांना केला आहे. ‘गुंजन सक्सेना’ या आगामी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका ऑनलाइन मुलाखतीत पंकजने हे विधान केलं.

“सामान्य जनतेला बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा त्यांच्या राज्याचा आरोग्य व शिक्षणासाठी किती बजेट आहे याची काळजी जास्त असली पाहिजे. शिक्षणासाठी सरकारने किती बजेट दिला आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लोकांना का रस आहे हेच मला कळत नाही. त्यांना त्या कलेक्शनचा नफासुद्धा मिळत नाही तरी कमाईत फार रस असतो. त्यातून तुम्हाला काय मिळतं”, असा प्रश्न त्याने प्रेक्षकांना विचारला आहे.

‘गुंजन सक्सेना’ या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 4:06 pm

Web Title: pankaj tripathi asks what do you care how much a film earns ssv 92
Next Stories
1 चैतन्य ताम्हाणेवर बॉलिवूडमधून कौतुकाचा वर्षाव; जॅकलीनने शेअर केली खास पोस्ट
2 दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मैत्रिणीने केला खुलासा
3 दोन वर्षांनंतर ‘या’ चित्रपटातून शाहरुख येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला?
Just Now!
X